Latest

पुणे : बजरंग सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश निश्चित

स्वालिया न. शिकलगार

जेजुरी (पुणे) : पुढारी वृत्तसेवा – जेजुरी येथील कार्यकर्ता मेळाव्यात बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश घ्यावा, असा निर्णय घेण्यात आला. यानंतर कार्यकर्त्यांच्या निर्णयामुळे आपण शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करीत आहोत अशी घोषणा बजरंग सोनवणे यांनी केली. या बैठकीला बीडमधील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

जेजुरी गडावर जावून घेतले खंडोबा देवाचे दर्शन

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी जेजुरी गडावर जावून खंडोबा देवाचे दर्शन घेतले. कुलधर्म कुलाचारनुसार भंडार खोबरे उधळून इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येवू दे, बीड मधील जनतेला सुख समृध्दी मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी केली.

यावेळी 'दै. पुढारी'शी बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, कार्यकर्त्यांचा मेळावा जेजुरीत आयोजित केला असून ते सांगतील त्या पक्षात आपण प्रवेश करणार आहे. बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी आपण काम करीत असून जनता जे निर्णय घेईल, त्या प्रमाणे आपण राजकीय भूमिका घेणार आहोत.

SCROLL FOR NEXT