Latest

अ‍ॅक्शन कॉमेडी ‘बच्चन पांडे’चा ट्रेलर रीलिज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

अक्षयकुमारच्या आगामी 'बच्चन पांडे' या अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी रीलिज झाला. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात कृती सेनन आणि जॅकलिन फर्नांडिसही मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटातील अक्षयचा लूक जबरदस्त आहे. त्याने गँगस्टर साकारला आहे; पण तो नेहमीपेक्षा वेगळा आहे. जास्त कू्रर आहे, तसेच विनोदीही आहे. कृतीने एका दिग्दर्शकाची भूमिका साकारली आहे, तर जॅकलिनने अक्षयच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली आहे.

होळीनिमित्त 18 मार्च रोजी हा चित्रपट रीलिज होणार आहे. चित्रपटात अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, प्रतीक बब्बर, संजय मिश्रा, अभिमन्यू सिंह यांच्याही भूमिका आहेत. तमिळ चित्रपट 'जिगरठंडा'चा हा रिमेक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आगामी काळात अक्षयचे 'रक्षाबंधन, 'पृथ्वीराज', 'गोरखा', 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'राम सेतू', 'ओह माय गॉड 2', 'मिशन सिंड्रेला', 'सेल्फी' हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

SCROLL FOR NEXT