Latest

Ayush Badoni : आयुष बडोनीच्या षटकारानं फुटलं CSK समर्थक महिलेचं डोकं! (video)

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखनौ आणि चेन्नई यांच्यात गुरुवारी (दि. ३१) अतिशय रोमांचक सामना झाला. चेन्नईने लखनौला 211 धावांचे लक्ष्य दिले, जे लखनौने 20 व्या षटकात पूर्ण केले. लखनौच्या डावात 19 व्या षटकात एक धक्कादायक घटना पहायला मिळाली. ज्यात एक प्रेक्षक महिला चक्क जखमी झाली. (Ayush Badoni)

झाले असे की, लखनौकडून खेळत असलेल्या आयुष बडोनीने (Ayush Badoni) शिवम दुबेच्या शॉर्ट लेन्थ चेंडूवर शानदार स्वीप फटका मारत षटकार खेचला. पण हा चेंडू स्टेडियममध्ये उपस्थित असणा-या आणि सामन्याचा आनंद घेणा-या एका महिलेच्या डोक्यात आदळला. यानंतर ती महिला वेदनेने ओरडू लागली आणि तिचे डोके हातात धरून बसलेली दिसली. आजूबाजूचे सर्व प्रेक्षक मात्र बडोनीने मारलेल्या षटकाराचा आनंद घेताना दिसले. मात्र, सुदैवाने त्या महिला प्रेक्षकाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. काही वेळाने कॅमेरा जखमी महिलेकडे फोकस करण्यात आला तेव्हा ती मॅच एन्जॉय करताना दिसली. ती महिला चेन्नई सुपर किंग्जची चाहती होती.

लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 210 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौ संघाने 4 गडी गमावून 211 धावा केल्या आणि सामना जिंकला. धोनीने या सामन्यात 6 चेंडूत 16 धावांची जलद खेळी केली.

आयपीएलपूर्वी रोहितने मोडले प्रेक्षकाचे नाक

आयपीएल सुरू होण्यापूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यात दिवस-रात्र कसोटी सामना खेळला गेला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सामन्याच्या पहिल्या दिवशी मारलेला एक षटकार खूपच धोकादायक ठरला. हिटमॅनने फटकालेल्या चेंडूने एका प्रेक्षकाच्या नाकाचे हाड तोडले. त्या प्रेक्षकाला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले, तिथे त्यावर उचरादरम्यान टाकेही घालावे लागले.

आयुष बडोनीची अप्रतिम खेळी (Ayush Badoni)

22 वर्षीय आयुषने आतापर्यंत आयपीएलमध्ये केवळ दोनच सामने खेळले असून दोन्ही सामन्यांमध्ये त्याने आपल्या फलंदाजीने दहशत निर्माण केली आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात संघाला सर्वाधिक गरज असताना आयुषने धावा केल्या. त्याने शेवटच्या 9 चेंडूत 19 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 211.11 राहिला.

आयुषने (Ayush Badoni) शिवम दुबेच्या गोलंदाजीची पिसे काढली. १९ व्या षटकात मारलेले षटकार यंदाच्या आयपीएलमधील सर्वोत्तम शॉट्सपैकी एक मानले जात आहेत. लखनौच्या टीमने आयुषवर जो आत्मविश्वास दाखवला आहे तो आश्चर्यकारक आहे. संघाचा कर्णधार केएल राहुलने तर आयुषला लखनौ संघाचा 'बेबी एबी डिव्हिलियर्स' अशी उपाधी देत कौतुकाचा वर्षाव केला आहे.

SCROLL FOR NEXT