Latest

भारताची आयुष इंडस्ट्री जगात भारी, ३ बिलियनवरून १८ डॉलरची भरारी ! केंद्रीय मंत्री एस. सोनोवाल यांची माहिती

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: निसर्गोपचार पद्धती किती उपयुक्त आहे, हे जगाने अनुभवले आहे. आयुष मंत्रालयाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे ही इंडस्ट्री जगात भारी ठरली असून ३ बिलियन यूएस डॉलर वरून १८.२ बिलियन डॉलर कमावणारी जगातील पहिली इंडस्ट्री ठरली असल्याची माहिती आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री एस. सोनोवाल यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

पुण्यातील ताडीवाला रोडवरील ' बापूभवन ' मधील राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्राची पाहणी करण्यासाठी ते आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, कोविड काळात आयुष मंत्रालयाची किंमत कळाली आहे. या विभागाने वेगवेगळ्या पद्धतीने सेवा देत नैसर्गिकरित्या उपचार करून आरोग्य चांगले कसे ठेवता येते हे सप्रमाण दाखवून दिले. यामुळेच आयुष इंडस्ट्रीची सर्व उत्पादने, औषधी विश्वासाने घेतली जात आहे.

२०१४ पर्यंत आयुष इंडस्ट्रीचा एकूण वाटा ३ यूएस बिलियन डॉलर्स एवढाच होता. या विभागाचा स्वंतत्र निर्माण केला गेला अन् सर्वच कायापालट झाला. निसर्गोपचार उपचार पद्धती फायदेशीर असल्याचे सिद्ध झाल्याने हीच इंडस्ट्री आज रोजी १८.२ बिलियन यूएस डॉलर वर गेली आहे. पुणे केंद्राच्या डॉ. लक्ष्मी यांनी त्यांच्या टीमच्या मदतीने केंद्राचे नाव जगात नेले आहे. भविष्यात म्हणजे २०४७ पर्यंत ' एक भारत, स्वस्थ भारत ' म्हणून उदयास येणार असून त्या दिशेने काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. आयुर्वेदिक व एनआरएचएम डॉक्टरामधील सुरू असलेल्या वादावर आरोग्य मंत्रालय व आयुष मंत्रालय मिळून निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच याबाबत निर्णय घेऊन मार्ग काढला जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री एस. सोनोवाल यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT