रायपूर; वृत्तसंस्था : छत्तीसगड हे अनेक अर्थांनी रामाशी संबंधित राज्य आहे. माता कौशल्येचे हे माहेर आहे. म्हणजेच श्री रामलल्लाचे आजोळ… मामांचे गाव… भाच्याचे कोडकौतुक म्हणूनच अयोध्येला येथून टनोगणती सुगंधी तांदूळ पाठविला गेला. कौशल्येचे मंदिरही या राज्यात आहे. या राज्याचे रामाच्या संदर्भातील सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे… येथील राम-नामी ही आदिवासी जमात… राम-नामी जमातीचे लाखो लोक संपूर्ण शरीरावर श्री रामाचे नाव गोंदवून घेतात, तेही कायमचे. (Ayodhya Ram Mandir Inauguration)
वेगवेगळ्या आवरणांखाली अनेकजण धर्मांतरला बळी पडताना दिसतात. पण या जमातीचे लोक मतांतरित होत नाहीत. रामनाम शरीरभर गोंदवून घेऊनही या जमातीचे समाधान होत नाही म्हणून रामनाम लिहिलेली वस्त्रेच ती धारण करते. यांच्या घरांच्या भिंतीही रामनामाने रंगवलेल्या असतात. शिकले सवरलेले रामनामीही एकमेकांना 'रामराम'शिवाय अभिवादन करत नाहीत. इतकेच काय तर एकमेकांना रामनामाने हाकही मारतात. (Ayodhya Ram Mandir Inauguration)
जांजगीर-चांपातील चारपारा नावाच्या गावातील परशूराम हे एक संत या जमातीत अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेले. ही जमात शुद्ध शाकाहारी आहे. रामनामी ही जमात असण्यासह एक स्वतंत्र संप्रदायही आहे. कुणीही त्यात दीक्षा घेऊ शकतो.
नव्या पिढीत मात्र बहुतांशजण कपाळावर अथवा हातावर एक वा दोनवेळा रामनाम गोंदवून परंपरा पुढे चालविताना दिसतात. पुढच्या 5-10 वर्षांत कदाचित सर्वांगावर रामनाम गोंदवून घेणारे रामनामी अपवाद ठरलेले असतील. (Ayodhya Ram Mandir Inauguration)
हेही वाचा :