Latest

Asian Games 2023 | सुवर्ण पदक मिळवण्याचा अविनाश साबळेचा निर्धार

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता भारताचा 3000 मीटर स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे याने वर्ल्ड चॅम्पियनशीपमधील निराशाजनक कामगिरी विसरुन हाँगझोऊ एशियन गेम्समध्ये (Asian Games 2023) राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण पदक मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

महराराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून आलेला साबळे या सत्रात झालेल्या कामगिरीवर संतुष्ट नाही. त्याने गेल्या महिन्यात हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे झालेल्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत पहिल्या हिटमध्येच सातव्या स्थानावरुन बाहेर पडला. त्यामुळे त्याला अंतिम फेरीत धावता आले नाही. असे असले तरी आशियाई स्पर्धेत तो सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे. वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये माझ्याकडून चुका झाल्या. त्याच्यानंतर पुन्हा आत्मविश्वास मिळवणे थोडे कठिण गेल्याची कबुली साबळेने दिली.

साबळे याने प्रसारमाध्यंमाशी दिलेल्या ऑनलाईन मुलाखतीत सांगितले की, ही स्पर्धा माझ्या हंगामाची सांगता असणार आहे. या वर्षी मी कोणत्याच स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवण्यासाठी सहभाग घेतला नव्हता, परंतु मला खात्री आहे की हाँगझोऊ येथे माझी सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याचा आणि पदक जिंकण्यात मला यश मिळेल. (Asian Games 2023)

सध्याच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात मी थोडा निर्धास्त असलो तरी 5000 मीटर स्पर्धेवरही माझे लक्ष असेल. साबळे 1 ऑक्टोबरला 3000 मीटर स्टीपलचेस तर 4 ऑक्टोबरला 5000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत भाग घेईल.

SCROLL FOR NEXT