Latest

पुणे: रिक्षा चालकाच्या आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलनकर्ते आरटीओ कार्यालयासमोर रिक्षा सोडून गेले घरी

अमृता चौगुले

पुणे, पुढारीवृत्तसेवा: शहरातील बेकायदा बाईक, टॅक्सीच्या वाहतुकीविरोधात पुण्यातील रिक्षा चालकांनी पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलनात सहभागी झाला नाही म्हणून आंबेगावमधील शिवसृष्टी चौकात प्रवाशी भाडे घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाला थांबवत इतर रिक्षा चालकांनी त्याची रिक्षा फोडली. तसेच रिक्षा चालक आरटीओ कार्यालयासमोर रिक्षा सोडून घरी निघून गेले आहेत. त्यामुळे आरटीओ कार्यालयात जाणारा रस्ता रिक्षा चालकांनी रिक्षा लावून बंद केला आहे.

शहरातील विविध रिक्षा संघटनांकडून आज चक्काजाम आंदोलन सुरु आहे. सोमवार दुपारनंतर हे आंदोलनकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

रिक्षाचालकांनी झोपून अडवला रस्ता

पुण्यातील संचेती हॉस्पिटल येथील चौक रिक्षा चालकांनी रस्त्यावर झोपून अडवला आहे. तसेच रिक्षाचालकांनी संगम ब्रिज, सीओईपीच्या कॉलेजच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर चक्काजाम केला आहे. याशिवाय पुणे रेल्वे स्टेशनला जाणारा शाहीर अमर शेख चौकातील रस्ता रिक्षाचालकांनी अडवला आहे. 'प्रशासनाने बाईक टॅक्सी बंद न करता मला फसवलं !'  अशा आक्रमक रिक्षा चालक घोषणा देत आहेत. त्यामुळे ऐन संध्याकाळच्या पीक ट्रॅफिक अवर्सच्या वेळी रस्ते जाम होण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT