Latest

धूम स्वयंचलित वाहनांची

Arun Patil

बाईक आणि मोटार तंत्रज्ञानात होणारे बदल विज्ञान आणि तंत्रज्ञानाची अनुभूती देतात. आता वाहनविश्वात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा नवा बदल 'सेल्फ ड्रायव्हिंग मोटारी'च्या रूपातून पाहावयास मिळत आहे. आगामी काळात स्वयंचलित तंत्राने धावणार्‍या गाड्या या मानवाचा प्रवास अधिकाधिक सुरक्षित करण्याबरोबरच सुलभ आणि स्वस्त करतील. या गाड्यांमुळे वाहन चालविण्याचा ताणही कमी राहणार आहे.

माणसाचा मेंदू हा प्रत्येक वेळी आयुष्य सुसह्य कसे राहील, याचा विचार करतो आणि त्यानुसार कृती करतो. आयुष्याच्या वाटचालीत स्कूटरपासून मोटारीपर्यंतची वाहने महत्त्वाची भूमिका बजावतात. लहानपणी आजोबांची स्कूटर आणि नंतर वडिलांची मारुती 800 च्या आठवणी सर्वांनाच भारावून टाकणार्‍या असतात. बाईक आणि मोटार तंत्रज्ञानात होणारे बदल विज्ञान आणि तंत्रज्ञानाची अनुभूती देतात. गेल्या काही दशकांपर्यंत वाहनांतील तांत्रिक बदल हे गिअर, हेडलाईट, इंटेरियर, एक्सेटियरपर्यंत मर्यादित असायचे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या ठिकाणी वीज आणि सीएनजीवर धावणार्‍या गाड्या उपलब्ध होत असून, त्या आपले जीवनमान पर्यावरण अनुकूल करत आहेत. इलेक्ट्रिक वाहने ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनामध्ये घट करण्याबरोबरच रस्ते अपघात आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

आता वाहनांच्या विश्वात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा नवा बदल 'सेल्फ ड्रायव्हिंग मोटारी'च्या रूपातून पाहावयास मिळत आहे. तंत्रज्ञान आणि वाहन कंपन्या यांच्यात 'सेल्फ ड्रायव्हिंग तंत्रज्ञाना'वरून स्पर्धा असल्याच्या बातम्या भविष्यातील वैशिष्ट्यपूर्ण मोटारीबाबत कुतूहल निर्माण करणार्‍या आहेत. आगामी काळात स्वयंचलित तंत्राने धावणार्‍या गाड्या या मानवाचा प्रवास हा अधिकाधिक सुरक्षित करण्याबरोबरच सुलभ आणि स्वस्तात करतील असे वाटू लागले आहे. आजच्या काळात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे; मात्र ही नवे तंत्रज्ञानयुक्त वाहने नव्या पिढीला दिलासा देतील. या गाड्यांमुळे वाहन चालविण्याचा ताणही कमी राहणार आहे. संपूर्णपणे स्वयंचलित वाहनातून प्रवास करणारा व्यक्ती हा वाचलेला वेळ अन्य कामाला देऊ शकते. अचूक तर्कावर धावणार्‍या गाड्या इंधनात बर्‍यापैकी बचत करतील. दिव्यांग व्यक्तीबरोबरच महिला आणि ज्येष्ठांसाठीही या गाड्या उपयुक्त मानल्या जात आहेत.

चालकाऐवजी मशिन तंत्रज्ञानाने धावणार्‍या गाड्या या चमत्कारापेक्षा वेगळ्या नाहीत. काही दशकांपूर्वी चालकाविना धावणार्‍या गाड्या चित्रपट व फिक्शनमध्ये दिसायच्या; पण चालकाविना मोटारीचा इतिहास हा बराच जुना आहे. 1478 मध्ये लियोनार्दो दा विंची यांनी स्वयंचलित मोटारीचा पहिला प्रारूप आराखडा तयार केला होता. दा विंची यांनी स्प्रिंग्जवर आधारित एक स्वयंचलित रोबोच्या रूपातून वाहनाचे सादरीकरण केले होते. अमेरिकेसह युरोपीय देशांच्या दिग्गज कंपन्या ऑटोमेशन तंत्रज्ञानाच्या फिचरयुक्त वाहने बाजारात आणत आहेत. ऑटोमोबाईल कंपन्यांबरोबरच टेस्ला, अमेझॉन, गुगल, उबरसारख्या तंत्रज्ञान कंपन्या या चालकविना असलेल्या गाड्यांच्या तंत्रज्ञानाचे पेटंट मिळवण्यात यशस्वी ठरल्या आहेत.

आजघडीला जगभरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत 'सेल्फ ड्रायव्हिंग' मोटार असून नसल्यासारखी आहे; मात्र अमेरिकी राज्य नेवादा हे सार्वजनिक वाहतुकीत वाहकाविना गाड्यांचा समावेश करणारे पहिले राज्य ठरले आहे. अमेरिकेतील अन्य राज्ये जसे कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, ओहियो, वॉशिंग्टन डीसीमध्ये चालकाविना गाड्यांची वर्दळ वाढली आहे. या मोटारीत उच्च प्रतीची ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टीम असून, ती वेगवेगळ्या माध्यमातून मिळणार्‍या डेटाचे संकलन करते. त्याचे एआय आणि मशिन लर्निंग अल्गोरिदमच्या माध्यमातून विश्लेषण करत असते. डेटा विश्लेषणच्या माध्यमातून मिळणार्‍या रिअल टाईम इनपुटच्या आधारावर गिअर, अ‍ॅक्सिलेटर, ब—ेकसह सर्व भागांना सूचना दिली जाते. एआय मशिन लर्निंग आणि न्यूरल नेटवर्क अल्गोरिदम हे संयुक्तपणे मोटारीस स्वयंचलितरीत्या वहन करण्यासाठी प्रोत्साहित करते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT