Latest

Australian Open 2024 : नोव्हाक जोकोविचला धक्का; जानिक सिन्नरकडून उपांत्य फेरीत पराभूत

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या इटलीच्या जानिक सिन्नरने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला उपांत्य फेरीत पराभूत केले. (Australian Open 2024)

यामुळे जोकोविचचे विक्रमी 11व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन आणि 25वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले. पुढील ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी त्याला फ्रेंच ओपनची वाट पाहावी लागणार आहे. सिन्नरने चार सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत जोकोविचचा 6-1, 6-2, 6-7,6-3 असा पराभव केला. 22 वर्षीय सिन्नर पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. (Australian Open 2024)

अंतिम फेरीत सिन्नरचा सामना अलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि डॅनिल मेदवेदेव यांच्यातील उपांत्य फेरीतील विजेत्याशी होणार आहे. ऑस्ट्रेलियन ओपनचे 10 विजेतेपद पटकावणारा जोकोविच आजच्या आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसला नाही. सिन्नरने पहिले दोन सेट एकतर्फी पद्धतीने जिंकले. तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि टायब्रेकरमध्ये विजय मिळवला. मात्र चौथ्या सेटमध्ये सिन्नरने दमदार पुनरागमन करत सेट 6-3 असा जिंकला. सिन्नरचा हा विजय त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक आहे.

ज्या-ज्यावेळी जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. तेव्हा त्याने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र, त्याच्या विक्रमात एका पराभवाची भर पडली आहे. जोकोविचने गेल्या सहा वर्षांपासून ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एकही सामना गमावला नव्हता. 2018 मध्ये या स्पर्धेत त्याला शेवटचा पराभव पत्करावा लागला होता. (Australian Open 2024)

22 वर्षे आणि 163 दिवस वयाच्या सिन्नर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा सर्वात तरूण खेळाडू बनला आहे. त्याने 2008 मध्ये केलेला जोकोविचचा विक्रम मोडला. यासह ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा सिनर हा पहिला इटालियन खेळाडू ठरला आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT