Latest

T-20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, ‘या’ दिग्‍गज खेळाडूंना डच्‍चू

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : T-20 विश्‍वचषक स्‍पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्‍यात आला आहे. नेतृत्त्‍वाची धुरा मिचेल मार्शकडे सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर ॲश्टन अगर, टीम डेव्हिड आणि नॅथन एलिस यांनाही संघात स्थान मिळवण्यात यश आले आहे.  संघातील बहुतांश खेळाडू  2022 टी-20 विश्वचषक आणि 2023 वनडे विश्वचषक संघाचा भाग होते. मात्र काही दिग्‍गज खेळाडूंना स्‍थान देण्‍यात आलेले नाही.

'या' दिग्‍गज खेळाडूंना मिळाला डच्‍चू

T-20 विश्‍वचषक स्‍पर्धेसाठी निवडलेला संघात ऑस्‍ट्रेलिया दिग्‍गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ, दिल्ली कॅपिटल्सचा स्फोटक फलंदाज जेक फ्रेझर मॅकगर्क, अनुभवी वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ आणि अष्टपैलू मॅट शॉर्ट यांना स्थान मिळालेले नाही.

खराब कामगिरीनंतरही ग्रीनला संघात स्‍थान

खराब फॉर्म असूनही ग्रीनला संघात स्थान देण्यात आले आहे. स्टॉइनिसनेही या मोसमात विशेष कामगिरी केलेली नाही. ऑस्ट्रेलियन निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली म्हणाले की, "संघाला १५ पर्यंत मर्यादित ठेवणे नेहमीच आव्हान असते आणि आम्हाला फक्त महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करावे लागते.हा एक संतुलित संघ आहे आणि टी-20 विश्वचषकाच्या नवव्या आवृत्तीत चमकदार कामगिरी करण्याची क्षमता आहे.या संघात खूप अनुभव आहे. हा संघ खेळाच्या प्रत्येक पैलूचा समावेश करेल आणि वेस्ट इंडिजमध्ये यशस्वी होईल. "
T20 विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघ : मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन अगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झाम्पा.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT