Latest

AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाचे पाकिस्तानला ३६८ धावांचे लक्ष्य

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात टॉस जिंकून पाकिस्तानने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय चुकीचा ठरवत ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर जोडीने डावाला धमाकेदार सुरूवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांच्या द्विशतकी भागिदारीमुळे ऑस्ट्रेलियाने ९ गडी गमावून ३६७ धावांपर्यंत मजल मारली.

यामध्ये ऑस्ट्रेलियासाठी दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी शतके झळकावली. डेव्हिड वॉर्नरने १६३ आणि मिचेल मार्शने १२१धावांची खेळी केली. या दोघांशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला २५ धावा करता आल्या नाहीत. मार्कस स्टॉइनिसने २१ धावा केल्या. जोश इंग्लिशने १३ धावांचे योगदान दिले. मारांश लॅबुशेन ८ आणि स्टीव्ह स्मिथ ७ धावा करून बाद झाला. पॅट कमिन्सने ६ आणि मिचेल स्टार्कने २ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूड खातेही उघडू शकले नाहीत. एडन झाम्पा १ नाबाद धाव करून नाबाद झाला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक ५ बळी घेतले. हरिस रौफला तीन यश मिळाले. उसामा मीरने एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाविरीद्धच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी पाकिस्तानला ३६८ धावांचे लक्ष्य आहे.
AUS vs PAK)

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT