Latest

ATS Raid : दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या पाच जणांना अटक

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  एटीएसने (The Anti-Terrorism Squad – ATS) गुजरातमधील पोरबंदर मध्ये मोठी कारवाई केली आहे.  येथे त्यांनी इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान प्रांत (ISKP) या दहशतवादी संघटनेशी संबंधित पाच संशयितांना अटक केली आहे.  यामध्ये उबेद नासिर मीर, हनान हयात शवाल, मोहम्मद हाजीम शाह आणि 2 सुरतचे रहिवासी झुबेर अहमद मुन्शी आणि सुमेर बानो या 3 काश्मिरी तरुणांचा समावेश आहे. यासोबतच अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून अनेक घातक शस्त्रेही जप्त केली आहेत.

ATS Raid : आरोपी अफगाणिस्तानात पळून जाण्याच्या प्रयत्नात

एटीएसचे विशेष पथक गेल्या काही दिवसांपासून पोरबंदर आणि परिसरात विशेष कारवाईसाठी सक्रिय होते. या कारवाईचे नेतृत्व डीआयजी दीपन भद्रन आणि एसपी सुनील जोशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी पोरबंदरहून अफगाणिस्तानात पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. एटीएसने सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. मात्र, या कारवाई अत्यंत गुप्तता पाळण्यात येत आहे. आज संध्याकाळी एटीएस काही मोठा खुलासा करू शकते. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी अफगाणिस्तानात कार्यरत असलेल्या आयएसकेपी या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून गेल्या एक वर्षापासून ते एकमेकांच्या संपर्कात होते.

एटीएसच्या एकूण चार पथकांची कारवाई 

या मोहिमेत एटीएसचे एकूण चार पथके सातत्याने छापे टाकत होते. दोन पथके पोरबंदर नदीत तैनात करण्यात आली होती, तर अन्य दोन पथके द्वारका परिसरात आणि दुसरी टीम पोरबंदरमध्ये छापे टाकत होती. याशिवाय गुजरातमधील भरूच, सुरत आणि दिल्ली येथेही एटीएसच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी तपास केला आहे.

दोन दिवसांपूर्वी एटीएसच्या पथकाने द्वारकाच्या समुद्रात शोध घेतला होता. त्यानंतर काल सकाळपासून एटीएसच्या पथकाने पोरबंदरमध्ये तळ ठोकला होता. एटीएस आयजी दीपन भद्रन, एसपी सुनील जोशी, डीवायएसपी केके पटेल, डीवायएसपी शंकर चौधरी आणि त्यांच्या वरिष्ठ अधिनस्तांसह एक कर्मचारी पोरबंदरला पोहोचले. एटीएसचे विशेष पथक गेल्या काही दिवसांपासून पोरबंदर आणि परिसरात विशेष कारवाईसाठी सक्रिय होते.

महिलेच्या कबुलीवरून आरोपी पकडला

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान प्रांतशी (ISKP)  संबंधित एका महिलेला सुरतमधून सुमेरा नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेला एटीएसने गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने पकडले. तिला ताब्यात घेऊन पोरबंदरला नेण्यात आले असून तिच्या कबुलीजबाबाच्या आधारे पोरबंदर येथून आणखी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सुमेरा वडिलांना भेटण्यासाठी कन्याकुमारीहून सुरतला आली होती. तिचे लग्न  तामिळनाडू राज्यात झाले होते. तिच्याकडून चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

दहशतवादी भारतात हल्ला करण्याचा कट रचत होते

इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान प्रांत (ISKP) ही प्रतिबंधित संघटना अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानमध्ये सक्रिय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेले संशयित इराणमधून अफगाणिस्तानला जात होते. ते भारतात दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, एटीएसच्या पथकाने त्यांचा हा डाव हाणून पाडला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT