Latest

कळंब येथे चोरट्यांनी थेट एटीएमच पळवले

मोहन कारंडे

कळंब; पुढारी वृत्तसेवा : ४० लाख रुपयांच्या कॅशसह एटीएम मशीन चोरट्यांनी पळवल्याची धक्कादाय घटना धाराशिवमधील कळंब शहरात घडली आहे. येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम घेवून चोरट्यांनी पोबारा केला. आज पहाटे ही घटना उघडकीस आली. या एटीएममध्ये ४० लाख रुपये कॅश असल्याचे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

शहरातील भर चौकात ही घटना घडली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. शहरातील सीसीटीव्ही व येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाची कसून चौकशी पोलिस करत आहेत. धाराशिव जिल्ह्यात या अगोदर देखील एटीएम फोडीच्या घटना घडल्या होत्या. चोरट्यांनी यावेळी मात्र एटीएम फोडली नसून एटीएम मशीन पळवली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT