पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट 'मैं अटल हूं' चे प्रकरण मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे चित्रपटाची रिलीज डेट टळली. (Atal TV Serial) पण चित्रपटाआधी आता वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित एक मालिका टीव्हीवर सुरु होतेय. 'अटल' मालिकेच्या माध्यमातून अटल बिहारी यांच्या बालपणीतील अनेक पैलू उलगडण्यात येतील. (Atal TV Serial)
संबंधित बातम्या –
'अटल' मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या लहानपणीच्या कहाण्या दाखवण्यात येतील. शिवाय, ते राजकारणात कसे आले, या घटनेवरदेखील प्रकाश टाकला जाईल. अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले, यावर देखील प्रकाश टाकण्यात येईल.
अटल बिहारी वाजपेयी एक प्रभावशाली नेते होते. अँड टीव्ही मालिका 'अटल' च्या माध्यमातून त्यांच्या बालपणीचे अनेक किस्से प्रस्तुत करेल. या मालिकेमध्ये एका अशा नेत्याच्या आयुष्याच्या प्रारंभिक वर्षांची कहाणी दाखवण्यात येईल. तसेच या मालिकेत त्यांच्या आईच्या संबंधावरही प्रकाश टाकला जाईल.
अँड टीव्हीने 'अटल'चा प्रोमो रिलीज केला आहे. या शोसाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या बालपणी आणि तारुण्यातील भूमिकेसाठी कलाकारांची निवड अद्याप बाकी आहे.