Latest

UGC कडून सहाय्यक प्राध्यापक पदाच्या नियमात मोठा बदल; ‘पीएचडी’ची आवश्यकता नाही

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठीच्या नियमांमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगने (UGC) मोठा बदल केला आहे. युजीसीने सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी थेट भरतीसाठी  NET/SET/SLET हा किमान निकष आवश्यक आहे, असे म्हटले आहे. याविषयीची माहिती युजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी दिली असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

यापूर्वी सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त होण्यासाठी NET/SET/SLET सह पीएचडीचा निकष कायम होता. परंतु विद्यापीठ अनुदान आयोगने (UGC) नुकत्याच जाहीर केलेल्या बदलानुसार, उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी NET/SET/SLET हा किमान निकष पुरेसा असल्याचे युजीसीने म्हटले आहे. UGC सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी 30 जून 2023 पासून ही अधिसूचना जारी केली आहे आणि नवीन नियम 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात आले आहेत, असे स्पष्ट केले आहे.

यूजीसीचे अध्यक्ष प्रोफेसर एम जगदीश कुमार यांनी ट्विट केले आहे की, विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी पीएचडी हा पर्यायी पात्रता निकष राहील. सहाय्यक प्राध्यापकांच्या थेट भरतीमध्ये किमान पात्रता निकष लावून नेट/सेट/एसएलईटी अनिवार्य करण्यात आली आहे, असे म्हटले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT