Latest

Ashwin Dani passes away | एशियन पेंट्सचे सहसंस्थापक अश्विन दाणी यांचे निधन

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : भारतीय पेंट कंपनी एशियन पेंट्सचे सहसंस्थापक अश्विन सूर्यकांत दाणी यांचे गुरुवारी वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. याबाबतचे वृत्त CNBC-TV18 ने दिले आहे. अश्विन दाणी हे एक भारतीय अब्जाधीश उद्योगपती होते. १६ देशांमध्ये कार्यरत असलेली भारतातील सर्वात मोठी पेंट कंपनी एशियन पेंट्स लिमिटेडचे ते नॉन एक्झिक्युटिव्ह अध्यक्ष होते. (Ashwin Dani passes away)

 संबंधित बातम्या 

डिसेंबर १९९८ ते मार्च २००९ दरम्यान ते कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. दाणी यांनी १९६८ मध्ये एशियन पेंट्समध्ये वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह म्हणून त्यांच्या उद्योग क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी कंपनीचे नेतृत्व केले. २१,७०० कोटी रुपयांच्या समूह उलाढालीसह देशातील सर्वात मोठी पेंट निर्माता म्हणून कंपनीच्या वाढीसाठी दानी यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले.

दरम्यान, एशियन पेंट्सचे शेअर्स सुमारे ४ टक्क्यांनी घसरून ३,१६९ रुपयांवर आले. या शेअर्समध्ये घसरण अशा दिवशी आली जेव्हा एशियन पेंट्सचे सहसंस्थापक अश्विन दाणी यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. अधिकृत स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये एशियन पेंट्सने याची पुष्टी केली आहे.

"तीव्र दुःखाने आम्‍ही तुम्‍हाला कळवत आहोत की, कंपनीचे नॉन एक्झिक्युटिव्ह संचालक अश्‍विन दाणी आज आपल्यातून निघून गेले," असे एशियन पेंट्सने म्हटले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT