Latest

Asian Games 2023 TT Semifinal : सुतीर्था-अहिकाला कांस्‍य

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आशियाई क्रीडा स्‍पर्धेत आज टेबल टेनिसमधील महिला दुहेरीत भारतीय खेळाडूंना उपांत्‍य  सामन्‍यात पराभवाला सामाेरे जावे लागले.  चीनची विश्वविजेता जोडीचा पराभव करत उपांत्‍य फेरीत धडक मारलेल्‍या अहिका मुखर्जी आणि सुतीर्था मुखर्जी जाेडीचा उत्तर कोरियाच्या चा सुयोंग आणि पा सुग्योंग यांनी  ७-११, ११-७, ८-११, ११-८  ११-९, ५-११, ११-२ असा पराभव केला. यामुळे भारताला टेबल टेनिसमध्‍ये कांस्‍य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

Asian Games 2023 TT Semifinal : पहिल्‍या गेममध्‍ये भारताला आघाडी 

उपांत्‍य सामन्‍यात पहिल्‍या गेममध्‍ये भारतीय खेळाडूंनी आपली पकड निर्माण केली. २-७ अशी पाच गुणांनी निर्णायक आघाडी घेतली आणि ७-११ असा पहिला गेम आपल्‍या नावावर केला. दुसर्‍या गेममध्‍ये उत्तर कोरियाच्‍या जोडीने कम बॅक करत ९-६ अशी आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवत दुसरा गेम ११-८ असा जिंकत सामन्‍यात बरोबरी साधली.

Asian Games 2023 TT Semifinal : तिसरा गेममध्‍ये काेरियाचे कमबॅक

सामन्‍यात बरोबरी झाल्‍यानंतर तिसरा गेम अत्‍यंत चुरशीचा झाला. सुतीर्था आणि अहिका यांनी लय बिघडू न देता २-५ अशी आघाडी कायम ठेवली. मात्र ही आघाडी कायम राहिली नाही. चा सुयोंग आणि पा सुग्योंग यांनी ५-५ अशी बरोबरी साधली. अत्‍यंत चुरशीच्‍या या गेममध्‍ये भारताने आघाडी घेत या गेमवर ७-११ असा कब्‍जा केला.  चाौथ्‍या गेममध्‍ये उत्तर काेरियाने ३-० अशी आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवत या जाेडीने ११-८ असा गेम जिंकत सामन्‍यात पुन्‍हा बराेबरी साधली.

उत्‍कृष्‍ट टेबल टेनिसचे प्रदर्शन

अत्‍यंत चुरशीच्‍या सामन्‍यात दाेन-दाेन गेमने बराेबरी साधल्‍यानंतर पाचवा गेम अत्‍यंत राेमहर्षक झाला.  दाेन्‍ही देशांच्‍या जाेडीने उत्‍कृष्‍ट टेबल टेनिसचे प्रदर्शन करत एका गुणांसाठी संघर्ष केला. मात्र अखेर पाचवा गेम उत्तर काेरियाने ११-९ असा आपल्‍या नावावर करत सामन्‍यात आघाडी घेतली. मात्र सहाव्‍या गेममध्‍ये सुतीर्था आणि अहिका यांनी आपला नैसर्गिक खेळ करत दमदार कमबॅक करत निर्णायक ५ गुणांची आघाडी घेतली. आणि सहावा गेम असा ५-११ असा आपल्‍या नावावर करत सामना बराेबरीत आणला. अखेरच्‍या सातव्‍या गेममध्‍ये उत्तर काेरियाच्‍या जाेडीने निर्णायक ६ गुणांची आघाडी घेतली. ही आघाडी कायम  ठेवत  ११-२ असा गेम आपल्‍या नावावर करत फायनलमध्‍ये धडक मारली.

चीनला धक्‍का देत भारताने मारली हाेती उपांत्‍य फेरीत धडक

टेबल टेनिस खेळात चीनचा माेठा दबदबा आहे. उपांत्‍यपूर्व फेरीत भारताच्‍या अहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी यांनी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनची विश्वविजेता जोडी वांग यिदी आणि चेन मेंग यांचा ११-५, ११-५, ५-११, ११-त्‍याच्‍या या जबरदस्‍त कामगिरीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्‍ये महिला दुहेरीत भारतासाठी पदक निश्चित झाले होते.

SCROLL FOR NEXT