Latest

Asian Games 2023 : स्क्वाश स्पर्धेत भारताकडून पाकिस्तानचा दारूण पराभव

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क Asian Games 2023 : भारताच्या पुरूष आणि महिला स्क्वाश संघाने आशियाई क्रीडा स्प्रर्धेत शानदार सुरुवात केली. स्क्वाश पुरूष संघाने सिंगापूरचा तर महिला संघाने पाकिस्तानचा पराभव केला. महिला संघातील जोशना चिनप्पा, १५ वर्षाची अनाहत सिंह आणि तन्वी खन्ना यांनी पाकिस्तानच्या महिला संघाचा ३-० असा एकतर्फी पराभव केला. पुरूष संघात हरिदर पाल संधू, सौरव घोषाल, अभय सिंह यांनी सिंगापूर संघावर विजय मिळवला.

पाकिस्तानचा १६ मिनिटांत खेळ खल्‍लास

आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये पदार्पण करणाऱ्या अनाहत सिंहने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या सादिया गुलचा १६ मिनिटात ११-६, ११-६, ११-३ असा पराभव केला. तर जोशना चिनप्पा सहाव्यांदा आशियाई स्पर्धेमध्ये सहभागी झाली आहे. तिने सादिकला ११-२, ११-६, ११-२ अशा फरकाने पराभूत केले. (Asian Games 2023 )

महिला स्क्वाश स्पर्धेत पूल अ आणि पूल ब मधील पहिले दोन संघ सेमी फायनलसाठी पात्र होणार आहेत. पूल बमध्ये भारत, पाकिस्तान, मलेशिया, चीन आणि नेपाळ या संघाचा समावेश आहे.

पुरूषांच्या संघात दुखापतीतून सावरणाऱ्या रहिंदरला सुरूवातीच्या सामन्यात सिंगापूरच्या जेरोम क्लेमेंटने झुंज दिली. मात्र या सामन्यात हरिंदरने ११-४, १३-११, ८-११, ११-७ अशा फरकाने सामन्यात विजय मिळवला. सहाव्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या घोषालने सॅम्युअल कंगचा ११-९, ११-१, ११-४ ने पराभव केला. तर अभय सिंहने मार्कस फुआचा १-७, ११-७, ११-७ ने पराभव केला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT