Latest

Asian Games 2023 : रोशिबिनाची वुशूमध्ये ‘रौप्य’, तर अनुष अग्रवालाची घोडेस्वारीत कांस्य पदकाला गवसणी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या दिवशीही भारताची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. 27 सप्टेंबरला भारतीय खेळाडूंनी एकापाठोपाठ एक पदके जिंकली. यानंतर, 28 सप्टेंबर रोजी वुशूमध्ये भारताने पहिले पदक जिंकले. रोशिबिना देवीने रौप्य पदकावर नाव कोरले. महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीत तिला चीनच्या खेळाडूकडून पराभवाचा सामना करावा लागला.


यानंतर अनुष अग्रवालाने घोडेस्वारीत वैयक्तिक स्पर्धेत इतिहास रचला आणि कांस्य पदकाला गवसणी घातली. अनुषने गुरुवारी 73.030 गुण मिळवले आणि तो तिस-या स्थानी राहिला. अशा प्रकारे त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत दुसरे पदक मिळवले. मलेशियाच्या बिन मोहम्मद फाथिल मोहम्मद काबिल अंबाबने एकूण 75.780 गुणांसह सुवर्णपदक तर हाँगकाँगच्या जॅकलिन विंग यिंग स्यूने 73.450 गुणांसह रौप्य पदक जिंकले.

SCROLL FOR NEXT