Latest

Asia Games Hockey : पाकिस्तानचा धुव्वा! भारताने हॉकीमध्ये नोंदवला १०-२ असा ऐतिहासिक विजय

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई क्रीडा स्‍पर्धेत भारताने हाॅकीमध्‍ये आज (दि.३०) पाकिस्तानचा धुव्वा उडवला. या सामन्‍यात १०-२ असे पाकिस्‍तानच्‍या संघाला चारीमुंड्या चीत करत मोठ्या दिमाखात उपांत्य फेरीत (सेमी फायनल) धडक मारली. भारत आणि पाकिस्‍तानमधील हॉकी सामने नेहमीच चुरशीचे झाले आहे. यापूर्वी भारताने पाकिस्‍तानचा ७-४ ने पराभव केला होता. मात्र आजच्‍या सामन्‍यात भारताने पाकिस्‍तानचा १०-२ असा पराभव करत आजवरचा हॉकीच्य़ा ऐतिहासातील पाकिस्तानविरूद्धचा सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. विशेष म्‍हणजे, पाकिस्‍तानविरुद्ध १० गोल कोणत्‍याही संघाने डागल्‍या नव्‍हता. आज पाकिस्‍तानच्‍या हॉकी संघाला आंतरराष्‍ट्रीय स्‍पर्धेत आजवरच्‍या सर्वात नामुष्‍कीजनक पराभवाला सामाेरे जावे लागले आहे.  (Asia Games Hockey)

मनदीप सिंहने केला गोलचा शुभारंभ

मनदीप सिंहने भारताला पहिल्याच क्वार्टर आठव्या मिनिटाला गोल करत संघाला १-० ने आघाडी मिळवून दिली. कर्णधार हरमनप्रीत सिंहने पेनल्टीवर दुसरा गोल करत पहिल्या क्वार्टरमध्ये संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली.

कर्णधार हरमनप्रीतने डागले चार गाेल; भारताने पाडला गोलचा पाऊस

दुसऱ्या क्वार्टरच्या प्रारंभीच भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने दुसऱ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर वैयक्तिक दुसरी आणि संघासाठी तिसरी गोल करत संघाला आश्वासक आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या क्वार्टरच्या अखरेस भारताने गोल करत सामन्यात ७-१ अशी आघाडी मिळवली. सामन्यातील तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटी भारतीय संघाने चढाई केली. यावेळी पाकिस्तान संघाकडून फाऊल झाला. यामुळे पंचांनी भारतीय संघाला पेनल्टी किक बहाल केली. या संधीचा फायदा घेत भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने वैयक्तिक तिसरा आणि चौथा गोल करत संघाला ६-० अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली.

चौथ्या क्वार्टरच्या प्रारंभी भारतीय संघाने उत्कृष्ठ पासिंगचे प्रदर्शन करत भारताच्या समशेर सिंगने गोल आठवा गोल डागला. आक्रमक पासिंगच्या सहाय्याने पाकिस्तानच्या बचावफळीला भेदत चौथ्याच्या क्वार्टरच्या चौथ्या मिनिटाला  एल.के. उपाध्येने भारतासाठी ९ वा गोल केला.   चौथ्या कॉर्टरमध्ये वरूण कुमार याने वैयक्तिक दुसरा आणि  संघासाठी दहावा गोल करत सामन्यात १०-२ अशी आघडी मिळवली. तिसरा क्वर्टरमध्ये  वरूण कुमारने शानदार गोल करत भारताला ७-१ अशी आघाडी मिळवून दिली.  यानंतर तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या मिनिटात पाकिस्तानच्या अब्दुल राणाने पाकिस्तानसाठी दुसरा गोल केला.

पाकिस्तानचा आजवरचा सर्वात नामुष्कीजनक पराभव

पाकिस्तानच्या सोफियाने तिसऱ्या क्वार्टरच्या सातव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत पाकिस्तानला पहिले यश मिळवून दिले. त्याच्या या कामगिरीमुळे पाकिस्तानच्या गोल फलकावर शून्य आकडा राहण्याची नामुष्की टाळली. भारत आणि पाकिस्‍तानमधील हॉकी सामने नेहमीच चुरशीचे झाले आहे. यापूर्वी भारताने पाकिस्‍तानचा ७-४ने पराभव केला होता. मात्र आजच्‍या सामन्‍यात भारताने पाकिस्‍तानचा १०-२ असा पराभव करत आजवरचा हॉकी एतिहासातील पाकिस्तानविरूद्धचा सर्वात मोठा विजय नोंदवला आहेत. तर, पाकिस्तानचा आजच्या सामन्यातील आजवरचा सर्वात नामुष्कीजनक पराभव ठरला आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाची जबरदस्त कामगिरी

आशियाई क्रीडा स्‍पर्धेत भारतीय हॉकी संघाने आतापर्यंत आश्‍वासन कामगिरी केली आहे. साखळी सामन्‍यात उझबेकिस्तानचा 16-0 असा पराभव करत स्‍पर्धेतील आपले वर्चस्‍व स्‍पष्‍ट केले होते. नंतर हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने सिंगापूरचा 16-1 असा पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला. यानंतर टीम इंडियाने २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या जपानच्‍या संघाचार 4-2 असा पराभव करून विजयाची हॅट्ट्रिक साधली.

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताने केला होता पाकिस्तानचा पराभव

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्‍या सामन्यादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना यावर्षी ऑगस्टमध्ये झाला होता. भारतीय संघाने हा सामना 4-0 असा जिंकला होता. 2013 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात हॉकेचे 24 सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने या कालावधीत 16 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने पाच सामने जिंकले आहेत. तीन सामने अनिर्णित राहिले. दोन्ही देशांदरम्यान एकूण 179 सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने ६५ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने ८२ सामने जिंकले आहेत. 32 सामने अनिर्णित राहिले आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT