Latest

Asia Cup : मायदेशात श्रीलंका संघाचे जल्लोषी स्वागत

Arun Patil

कोलंबो ; वृत्तसंस्था : श्रीलंकेने आशिया चषक 2022 (Asia Cup) स्पर्धा जिंकून देशवासीयांना आनंद दिला. आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेसाठी हा खूप मोठा विजय आहे. याच संकटामुळे आशिया चषक त्यांच्या देशातून दुबईला हलवला गेला. त्यात पहिल्या सामन्यात हार मानावी लागल्यानंतर त्यांच्याकडून जेतेपदाच्या अपेक्षाच कुणी केल्या नव्हत्या. पण, हा संघ उभा राहिला आणि एकामागून एक विजय मिळवून जेतेपदाचा चषक उंचावला.

आशिया चषक जिंकून मायदेशात परतलेल्या श्रीलंकन संघाचे कोलंबोत जंगी स्वागत केले गेले. दासून शनाकाच्या नेतृत्वाखालील संघाने जेतेपदाच्या सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवला आणि मंगळवारी पहाटे 5 वाजता संघ कोलंबोत दाखल झाला. श्रीलंका क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी आणि क्रीडा मंत्री यांनी खेळाडूंचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर सकाळी खेळाडूंची ओपन डेक बसमधून मिरवणूक काढण्यात आली.

आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्रही न ठरलेल्या श्रीलंकेकडून आशिया चषक विजयाची अपेक्षा कुणी केलीच नव्हती. 3 सप्टेंबरला जेव्हा आशिया चषक 2022 (Asia Cup) चा जेता कोण असेल असा पोल घेतला गेला, तेव्हा सर्वाधिक 69 टक्के मत भारताच्या बाजूने होती. त्यापाठोपाठ पाकिस्तान, अफगाणिस्तान यांचा क्रमांक होता. श्रीलंकेच्या वाट्याला शून्य टक्के मते आली.

SCROLL FOR NEXT