Latest

Asia Cup 2022 : अफगाणिस्तानने ५ विकेट्सच्या मोबदल्यात श्रीलंकेला दिले १७६ धावांचे आव्हान

अमृता चौगुले

शारजाह; पुढारी ऑनलाईन : सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज यांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने (Asia Cup 2022) श्रीलंकेला १७६ धावांचे आव्हान दिले आहे. श्रीलंकेने दिलेल्या फलंदाजीचे निमंत्रण स्विकारुन अफगाणिस्तानने निर्धारीत षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात १७५ धावा बनवल्या. सुपर ४ मधील पहिल्या सामन्यात श्रीलंकेला १७६ धावा बनवायच्या आहेत. यापुर्वी साखळी सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेला पराभूत केले होते. फलंदाजी प्रमाणे अफगाणिस्तानची गोलंदाजी देखील तगडी आहे. त्यामुळे या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला मोठी कसरत करावी लागणार आहे.

अफगाणिस्तानच्या (Asia Cup 2022) सलामीवीरांनी सुरुवातीपासून श्रीलंकेच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. सलामी जोडीने पाच षटकात ४६ धावांचा फलकावर लावले. या नंतर हजरतुल्लाह झजाई हा १३ धावांवर बाद झाला. यानंतर डावाची सुत्रे गुरबाज आणि इब्राहीम जारदान यांनी घेतली. दरम्यान नवव्या षटकात गुरबाज याने फक्त २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर देखिल त्याने आपली वादळी खेळी सुरुच ठेवली. १३ व्या षटकात अफगाणिस्तानने १०० धावा फलकावर लावल्या. १६ व्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या नादात गुरबाज झेल देऊन बाद झाला. त्याने फक्त ४५ चेंडूत ८४ धावांची खेळी खेळली. यामध्ये त्याने ४ चौकार आणि तब्बल ६ षटकार ठोकले.

गरबाज नंतर इब्राहीम जारदान याने काहीकाळ डावाची सुत्रे हाती घेतली. तो अठराव्या षटकात ४० धावांवर बाद झाला. त्याने ३८ चेंडूचा सामना करत २ चौकार व १ षटकार लगावला. एकोणिसाव्या षटकात मोहम्मद नबी फक्त १ धाव करुन झेल बाद झाला तर नजीबुल्ला जारदान हा १७ धावांवर धावबाद झाला. या षटकात श्रीलंकेने अफगाणिस्तानला ३ धावा दिल्या. अखेरच्या षटकात पहिले तीन चेंडू राशिद खान याने खेळून काढले व चौथ्या चेंडूवर दोन धावा, पाचव्या चेंडूवर षटकार आणि अखेरच्या चेंडूवर दोन धावा घेताना राशिद खान धाव बाद झाला. अशा प्रकारे अफगाणिस्ताने पाच गड्यांचा मोबदल्या १७५ धावा केल्या. (Asia Cup 2022)

अफगाणिस्तान संघ : हजरतुल्ला झजाई, रहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जारदान, मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्ला जारदान, करीम जनात, समिउल्ला शिनवारी, रशीद खान, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, फझलहक फारुकी

श्रीलंका : पथुम निसंका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चरिथ असलंका, दनुष्का गुणथिलका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), वनिन्दु हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थिक्क्षना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT