Latest

विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात आश्रमशाळा अधीक्षकाला अटक

अमृता चौगुले

अकोले : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील खडकी येथील अनुदानित प्राथमिक-उच्च माध्यमिक आश्रमशाळेत जातिवाचक शिवीगाळ व मारहाण करत महिला कर्मचार्‍याचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून अधीक्षक राजेश दगडू डुबे यांच्याविरुद्ध राजूर पोलिसात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून, त्यास अटक करण्यात आली आहे. याबाबत संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की अधीक्षक डुबे नेहमी वेगवेगळ्या कारणांवरून वाद घालून त्रास देतात. नुकतेच आश्रमशाळेत कामावर गेले तेव्हा स्वयंपाक कर्मचारी म्हणून अन्य दोन महिलादेखील हजर होत्या. आम्ही सर्वांनी स्वयंपाक बनविला.

दुपारी सर्व मुले जेवणासाठी भोजनगृहात आले, त्या वेळी अधीक्षक डुबे, मुख्याध्यापक राजेंद्र भांगरे व काही शिक्षकही उपस्थित होते. आम्ही मुलांना जेवण वाढत असताना अधीक्षक डुबे माझ्याजवळ आले व शिव्या देऊन 'कुठे चालली, येथे भाकरी वाढ' म्हणाले. त्यांना व्यवस्थित बोलण्याची विनंती केली, त्यावर जातिवाचक शिवीगाळ करून त्यांनी विनयभंग केला. मी आरडाओरडा केला, तेव्हा केस ओढून, हात पिरगाळत मारहाण केली. मुख्याध्यापक, शिक्षकांनी डुबे यास बाजूला नेले. राजूर पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून, डुबे यास अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे तपास करीत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT