Latest

ASER 2023 Report: १४ ते १८ वयोगटातील २५ टक्के मुले प्रादेशिक भाषेतील मजकूर वाचण्यास असमर्थ – अहवाल

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: शैक्षणिक स्थिती वार्षिक अहवाल २०२३ आज (दि. १७) जाहीर झाला. यामध्ये अनेक महत्त्वाचे खुलासे करण्यात आले आहेत. १४ ते १८ वर्ष वयोगटातील किशोरवयीन त्यांच्या प्रादेशिक भाषांमध्ये इयत्ता २ रीच्या पातळीचा मजकूर अस्खलितपणे वाचू शकत नाहीत. तर किमान ४२.७ टक्के किशोरवयीन इंग्रजीतील वाक्ये वाचू शकत नाहीत असे नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या वार्षिक शैक्षणिक स्थिती अहवाल (ASER) सर्वेक्षणात म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. (ASER 2023 Report)

शिक्षण केंद्रित ना-नफा संस्था 'प्रथम फाऊंडेशन'च्या नेतृत्वाखालील "मूलभूत गोष्टींच्या पलीकडे" शीर्षकाचा ASER 2023 अहवाल हा ग्रामीण भारतातील १४ ते १८ वर्षे वयोगटातील तरुणांवर प्रकाश टाकतो. यामध्ये देशातील २६ राज्यांमधील २८ जिल्ह्यातील सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये नोंदणी केलेल्या ३४ हजार ७४५ किशोरवयीन युवकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. २०१७ मध्ये ASER अहवालात या विशिष्ट वयोगटाचा समावेश करण्यात आला होता. (ASER 2023 Report)

अहवालानुसार, १४ ते १८ वर्षे वयोगटातील एकूण ८६.८% मुलांनी एकतर शाळा किंवा महाविद्यालयात नोंदणी केली आहे. ही नावनोंदणीची टक्केवारी वयोमानानुसार घसरते, असे देखील म्हटले आहे. उदाहरणार्थ, सध्या शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेश न घेतलेल्या तरुणांचे प्रमाण वयानुसार १४ वर्षे ३.९ टक्केवरून १६ वर्षांच्या १०.९ % आणि १८ वर्षांच्या मुलांमध्ये ३२.६ % पर्यंत वाढते, असे अहवालात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे. (ASER 2023 Report)

कोविड-19 साथीच्या आजाराच्या वेळी एक प्रमुख चिंतेची बाब म्हणजे उपजीविका धोक्यात आल्याने मोठी मुले शाळा सोडतील, ही भीती "निराधार ठरली" असे अहवालात नमूद केले आहे. "शाळाबाह्य मुले आणि तरुणांचे प्रमाण कमी होत आहे. (ASER 2023 Report)

SCROLL FOR NEXT