Latest

गर्दीतील चाहत्याने घेतलं आर्यनच्या हाताच चुंबन, आर्यनची प्रतिक्रिया पाहून भडकले नेटिझन्स…..

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टारकिड्स च्या वर्तुळातील बरेचदा लाईम लाईटमध्ये असलेलं नाव म्हणजे आर्यन खान. कधी लिंक अप्सच्या बातम्या तर कधी ड्रग्ज प्रकरणात आर्यनच नाव सतत समोर येत राहिलं आहे. जन्मापासूनच प्रसिदधीच वलय सोबत घेऊन फिरणारा आर्यन खान आता आपल्या बॉलीवूड डेब्यू साठी सज्ज झाला आहे.  पण आर्यन सध्या चर्चेत आला आहे ते त्याच्या डेब्यूसाठी नाही तर एका एका वेगळ्याच कारणासाठी. आर्यन अलीकडेच एअरपोर्टवर स्पॉट झाला. या दरम्यान त्याच्या एका जबरा फॅनशी त्याची भेट झाली. विशेष म्हणजे या फॅनने त्याला लाल गुलाब देत हातांचं चुंबनही घेतलं.

हा व्हीडियो सोशल मिडियावर व्हारायरल होताच नेटीझन्सनी आर्यनला ट्रोल करण्यास सुरुवात केली. कारण हा चाहता त्याच्या हातांच चुंबन घेत असताना आर्यनने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि दुसऱ्या फॅनसोबत सेल्फी घेण्यात मग्न झाल्याचं या व्हीडियोत दिसत आहे. या व्हीडियोवर कमेंट करताना नेटकरी म्हणतात, 'लोकांना काय हौस असते यांना इतका भाव द्यायची काय माहिती ?'
तर एकाने ' या जगात मूर्खांची कमतरता नाही' ही कमेंट केली आहे.  एकाने आर्यनवर कमेंट करत त्याला नशेडी म्हणलं आहे.
आर्यन खान आपला डेब्यू कोणत्याही भव्य सिनेमाने नाही तर ओटीटीवरील सिरीजने करणार असल्याच बोललं जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT