नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची दिल्लीत भेट घेतली. कॉंग्रेस नेते राहुल गांधीसुद्धा यावेळी उपस्थित होते. या भेटीमुळे कॉंग्रेस आणि आप यांच्यात समेट होऊन जागावाटपावरून होत असलेला संघर्ष शमल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेले काही दिवस केजरीवाल कॉंग्रेस नेतृत्वाला भेटीचा वेळ मागत असल्याचा चर्चा होत्या. अखेर आज ही भेट झाली. आप काँग्रेसला दिल्ली आणि पंजाबमध्ये फार जागा देण्यात उत्सुक नव्हते. दोन्ही पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांकडून यावरून आरोपांच्या फैरी झाडल्या जात होत्या. मात्र हा संघर्ष वाढेल असे वाटत असतानाच कॉंग्रेसने जागावाटपासाठी तयार केलेल्या राष्ट्रीय आघाडी समितीच्या आणि आपच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या. दोन्ही पक्षांमध्ये आतापर्यंत २ बैठका झाल्या आहेत.
शनिवारी इंडिया आघाडीची आभासी बैठक पार पडली. या बैठकीनंतर ही भेट झाली. त्यामुळे जागावाटपावरून असलेली झालेली नाराजी दूर झाल्याचे समजते.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.