Latest

डान्सर सपना चौधरी विरोधात अटक वॉरंट, नेमकं काय आहे प्रकरण?

स्वालिया न. शिकलगार

हरियाणाची डान्सर सपना चौधरी हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. लखनौ कोर्टाने सपना विरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. सपना चौधरी हिच्यावर डान्सचा कार्यक्रम रद्द करण्याचा आणि तिकिटाचे पैसे परत न देण्याचा आरोप आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

एसीजेएम, अतिरिक्त, मुख्य न्यायिक मॅजिस्ट्रेट, लखनौ यांनी हा आदेश दिला आहे. यामध्ये डान्सर सपना चौधरी विरोधात अटक वॉरंट जारी केलंय. याआधी याप्रकरणी एफआयआर १४ ऑक्टोबर, २०१८ रोजी एसआय फिरोज खान यांनी आशियाना पोलिस ठाण्यात दाखल केलं होतं. यामध्ये सपना हिच्यासोबत आयोजक जुनैद अहमद, नवीन शर्मा, कीवद अली, अमित पांडे आणि रत्नाकर उपाध्याय यांची नावेदेखील आहेत.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण तीन वर्षे जुने आहे. एका न्यूज एजन्सीनुसार, १३ ऑक्टोबर, २०१८ रोजी दुपारी ३ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत स्मृती उपवनमध्ये सपनाचा डान्सचा कार्यक्रम होता. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन तिकिटाची ३०० रुपयांनी प्रतिव्यक्ती विक्री झाली.
हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येत तिकिट घेण्यासाठी लोक उपस्थित होते. परंतु, सपना रात्री १० वाजेपर्यंत आली नाही. यावर प्रेक्षकांनी गोंधळ घातला. यानंतर तिकिट घेतलेल्यांचे पैसेदेखील परत दिले नाहीत.

SCROLL FOR NEXT