Latest

अर्जुन चौथ्यांदा झाला पिता, गॅब्रीएलाने दुसऱ्यांदा दिला मुलाला जन्म

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच वैयक्तिक जीवनाबद्दलही चर्चेत आहे. अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सने चार वर्षापूर्वी एका मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव अरिक असे होते. गॅब्रिएलाने एप्रिल, २०२३ मध्ये सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या दुसरी प्रेग्नेंसीची घोषणा करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आता ग्रॅबिएला दुसऱ्यांदा आई झालीय. अर्जुन रामपालने पोस्टच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे.

ग्रॅबिएला डेमेट्रियड्सने मुलाला दिला जन्म

अर्जुनने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक विनी-द-पूह (Winnie-the-Pooh) सोबत 'हॅलो वर्ल्ड' लिहिलेल्या टॉवेलच्या माध्यमातून फोटो शेअर केला आहे. या अभिनेत्याने पोस्टला कॅप्शन दिलीय, 'मला आणि माझ्या कुटुंबाला आज सुंदर मुलाचा आशीर्वाद मिळाला. आई आणि मुलगा दोन्ही ठिक आहेत. डॉक्टर आणि नर्सच्या अद्भुत टीमला धन्यवाद. आम्ही चंद्रावर आहोत. आपल्या सर्वांचे प्रेम आणि समर्थनसाठी धन्यवाद. हॅलोवर्ल्ड 20.07.2023'

फॅन्ससहित अनेक स्टार्स त्याचे अभिनंदन करत आहेत. बॉबी देओलने कमेंटमध्ये लिहिलं-'बधाई हो दोस्त.' राहुल देवने लिहिलं, 'खूप-खूप शुभेच्छा डॅडी आणि मम्मी.' निर्माती प्रज्ञा कपूरने लिहिलं, 'अखेर!! खूप अभिनंदन, बाळाला भेटण्यासाठी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही.' एमी जॅक्सन आणि दिव्या दत्ता यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.

अर्जुन रामपालने मेहर जेसियाशी लग्न केले होते. दोघांचे नाते दीर्घकाळ चालले नाही. दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. एक्स वाईफपासून अर्जुनला दोन मुली माहिका आणि मायरा आहेत. अर्जुन आणि गॅब्रिएलाची भेट २०१८ मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. काही महिन्यांनंतर दोघांनी डेटिंग सुरू केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT