Latest

Archana Puran Singh : अर्चना पुरन सिंहवर Sexist कमेंट, ट्रोलरला धरले धारेवर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कपिल शर्माची परीक्षक अर्चना पुरन सिंहचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अर्चना पूरन सिंहने एका ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले. यानंतर तिचे कौतुक होताना दिसतेय. तिने सोशल मीडियावर आपला एक जुना फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तिचे पती परमीत सेठीदेखील दिसत आहेत. अर्चनाने जुन्या दिवसांची आठवण करत हा फोटो शेअर केला होता. (Archana Puran Singh) या फोटोवर तिला खूप सारे कमेंट्स मिळाले. एका युजर फालतू कमेंट केल्यानंतर अर्चना भडकली. खूप नम्रतेने त्याला सडेतोड उत्तर दिले.

अर्चनाने सोमवारी इन्स्टाग्रामवर एक सेल्फी अपलोड केली होती. जो जुना फोटो होता, या फोटोमध्ये तिचे पती परमीत सेठीदेखील दिसत होते. या फोटोला अर्चनाने कॅप्शन लिहिली होती, गूगल मला आठवण करून देतो जीवन किती सुंदर राहिलं आहे. (Archana Puran Singh)

या फोटोवर नेटकऱ्यांनी पॉझिटिव्ह कमेंट्स केले आहेत. एका कमेंटमध्ये युजरने अर्चनाची खिल्ली उडवली. एका युजरने लिहिलं होतं-वुमन कमी मॅन ज्यादा दिसत आहेस.

अर्चनाने ट्रोलरला धरले धारेवर

यावर अर्चनाने ट्रोलरला धारेवर धरत सडेतोड उत्तर दिले की, 'किती फालतू विचार ठेवतेस इतक्या कमी वयात. थोडं शिक्षण घेतलं असतं र मोठ्यांशी कसे बोलायचे, हे समजले असते. प्लीज प्रत्येक वय, शेप, साईज आणि चेहऱ्याच्या महिलांचा सन्मान करा. तू पुरुषांकडून सन्मान कशी अपेक्षा ठेवू शकते, तू स्वत: एका महिलेचा सन्मान करत नाहीस.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT