Latest

Premachi Goshta : आतुरता अपुर्वाची! ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये सावनी निगेटिव्ह भूमिकेत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : . प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून भेटीला येतेय. (Premachi Goshta ) सावनी असे तिच्या भूमिकेचं नाव असून तिची या मालिकेत एन्ट्री होणार आहे. तिने साकारलेले पात्र हे अतिशय ग्लॅमरस आहे. दागिने, साड्यांपासून मेकअपपर्यंत सावनी अर्थातच अपूर्वा नेमळेकर या लूकमध्ये कमालीची दिसणार आहे. (Premachi Goshta)

'प्रेमाची गोष्ट'मध्ये अपूर्वा नेमळेकर ही सावनी ही भूमिका साकारतेय. तिची मालिकेतील एन्ट्री लक्षवेधी ठरलीय.

सावनी हे पात्र कसे आहे?

अपूर्वा नेमळेकरची सावनी ही भूमिका खलनायिकाच्या रुपात असेल. अनेक कांगोरे या पात्राला असणार आहेत. तब्बल ८ वर्षांनंतर ती या मालिकेच्या माध्यमातून स्टार प्रवाहसोबत दिसणार आहे. सावनीसाठी तिने वजन देखील कमी केलं आहे.

या या भूमिकेमागे प्रचंड मेहनत आणि अनेक महिन्यांपासूनची तयारी आहे. ग्लॅमरस लूक दिसण्यासाठी तिने आपल्या लूकवर विशेषे भर दिलाय. एक खलनायिका म्हणून हे पात्र अगदी वेगळे असणार आहे.

सागर-सावनी येणार समोरासमोर

प्रेमाची गोष्टच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, सागर-सावनी समोरासमोर आले आहेत. मुक्ता मिहिकाला घेऊन कॉलनीमध्ये बसलेल्या गणपती बाप्पाकडे येते. यावेळी सईसोबत सागर मंडपात येतो. हर्षवर्धन सागरला त्याच्या भूतकाळाची आठवण करुन देतो. पण सागर म्हणतो की, तो आता बदलला आहे. त्याचवेळी सावनीची एन्ट्री होताना दिसतेय.

SCROLL FOR NEXT