Latest

पुणे : यंदा शाळा सुरू होताच शिष्यवृत्तीसाठी अर्ज

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणार्‍या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये गेल्या पाच वर्षांत बर्‍याच जिल्ह्यांमध्ये विद्यार्थिसंख्येच्या तुलनेत निकालाची टक्केवारी घटली आहे. त्यामुळे यंदा शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होताच 1 जुलैपासूनच अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन करण्यासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती निकालात वाढ, गुणवत्तावाढ करण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थी निश्चित करून परीक्षेची पूर्वतयारी करून घेता येणार आहे. राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष महेश पालकर, माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी संयुक्त परिपत्रकाद्वारे शिक्षण विभागातील अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी नऊ ते दहा लाख विद्यार्थी देतात.

मात्र, गेल्या पाच वर्षांत बर्‍याच जिल्ह्यांमध्ये विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत निकालाची टक्केवारी घटल्याचे दिसून येते. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत शाळांचा निकाल वाढवण्यासाठी विद्यार्थी निश्चित करून त्यांचे अर्ज भरणे, त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे, त्यासाठी शाळांनी नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळा सुरू होताच मुख्याध्यापकांची सभा घेऊन विद्यार्थी निवड करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे नियोजन, अर्ज भरण्याची प्रक्रिया करण्याबाबत आवश्यक सूचना देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी

पाचवी
2018 – 16 हजार 593
2019 – 16 हजार 579
2020 – 16 हजार 684
2021 – 14 हजार 250
2022 – 16 हजार 232
आठवी
2018 – 13 हजार 759
2019 – 14 हजार 815
2020 – 14 हजार 744
2021 – 10 हजार 736
2022 – 12 हजार 939

पाचवी
2018 – 16 हजार 593
2019 – 16 हजार 579
2020 – 16 हजार 684
2021 – 14 हजार 250
2022 – 16 हजार 232
आठवी
2018 – 13 हजार 759
2019 – 14 हजार 815
2020 – 14 हजार 744
2021 – 10 हजार 736
2022 – 12 हजार 939

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT