Latest

Fruit tea : सुरतमध्ये मिळतो सफरचंद, केळी, चिकूचा चहा!

Arun Patil

सुरत : सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या पदार्थांचे फ्यूजन फूड बनवतानाचे व्हिडीओ पाहायला मिळतात. अनेक वेळा या विचित्र पदार्थांचे व्हिडीओ व्हायरल होतात. तर अनेक वेळा हे पदार्थ लोकांना खूप आवडतात. सध्या सोशल मीडियावर प्रत्येकाच्या आवडते पेय असलेल्या चहासोबत अनेक प्रयोग पाहायला मिळत आहेत. आता 'फ्रुट टी'चा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सहसा आपण चहा बनवण्यासाठी चहाच्या पानांसोबत वेलची, लवंग आणि आले घालतो. मात्र, सध्या चहासोबत पुन्हा एकदा अनोखा प्रयोग पाहायला मिळत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक चहावाला चहा बनवताना त्यामध्ये केळी, सफरचंद आणि चिकू घालून विचित्र पद्धतीने चहा बनवताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये रस्त्यावर एक विक्रेता फळांचा चहा बनवताना दिसत आहे. हे पाहून नेटकरी चांगलेच थक्क झाले आहेत.

या व्हिडीओमध्ये गुजरातच्या सुरतमध्ये 'फ्रुट टी' बनवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये असे सांगितले जात आहे की, हा चहा 10 वर्षांहून अधिक काळापासून बनवला जात असून, तो अनेकांना प्यायला आवडतो. केळी आणि चिकूचा चहा बनवण्यासाठी चहावाला दुधात साखर, केळी आणि चिकू घालून उकळवतो. त्यानंतर चहा गाळून सर्व्ह केला जातो, असे व्हिडीओमध्ये दिसत आहे. याशिवाय सफरचंदाच्या चवीचा चहा बनवण्यासाठी चहावाला उकळत्या चहात सफरचंद किसून घालताना दिसत आहे. सध्या व्हिडीओमध्ये विचित्र चहा पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. चहासोबत असे विचित्र प्रयोग करू नये, असं काही युजर्सचं म्हणणं आहे. तर, काही युजर्सना चहासोबतचा हा विचित्र प्रयोग आवडला आहे.

SCROLL FOR NEXT