Latest

Appi Aamchi Collector : अप्पी-अर्जुनच्या बाळाचा जीव धोक्यात ?

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अप्पीला पोटात हालचाल जाणवते आणि त्यामुळे अर्जुन एकदम घाबरुन जातो, तो घरातल्यान आवाज देतो आणि सगळे एकत्र जमा होतात. सर्वांना लवकरच अप्पीची डिलिव्हरी होणार असे वाटते म्हणून घरी आनंदाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे घरच्यामधील आनंदाचे वातावरण बघून मनीच्या डोक्यात नवीन प्लॅन शिजतोय. ( Appi Aamchi Collector )

संबंधित बातम्या 

एकिकडे घरात चर्चा रंगलेय अप्पीला मुलगी होणार की मुलगा?. दुसरीकडे अप्पीची डिलिव्हरी ज्या सरकारी हॉस्पिटलमध्ये होणार आहे. त्या हॉस्पिटलचे डॉक्टर त्याच्यासोबतच्या डॉक्टरांना सावध करून काही दिवस हॉस्पिटलमधील काळ्या व्यवहाराच्या गोष्टी लपवायला सांगतात. अप्पीची ज्या सरकारी हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी भरती होते. त्या हॉस्पिटलमध्ये एकच हार्ट मशीन असल्याने आणि ते अप्पीला दिल्याने एका मुलीच्या आईची परिस्थिती खालावली असल्याचे अप्पीला समजते.

हॉस्पिटलमध्ये एकच हार्ट मशीन कशी?, याचा गायतोंडेकडून शोध घेते. तेव्हा तिला डॉक्टर आकाश, डॉक्टर साळुंखे आणि व्यवस्थापन विभागाचे अधिकारी यांनी हॉस्पिटलच्या मशीन गायब केल्याचे समजते. तेव्हा अप्पी ऐन डिलिव्हरी आधी या सर्व दोषी लोकांना बडतर्फ करते.

दुसरीकडे अप्पीच्या या वागण्याने तर तिच्या बाळाला धोका तर निर्माण होणार नाही?, मनीच्या डोक्यात कोणता नवीन प्लॅन शिजतोय ?, अप्पी-अर्जुनच्या बाळावर कोणते संकट येणार आहे.? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. ( Appi Aamchi Collector )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT