Latest

‘अपेंडिसायटीस’कडे दुर्लक्ष नकोच, वेळीच उपचार करणे आवश्‍यक

Arun Patil

अपेंडिक्स वॉर्मच्या आकाराचा एक छोटा अवयव आपल्या पोटाशेजारी असतो. काही संसर्गामुळे अपेंडिक्सला सूज येऊ शकते. याला अपेंडिसायटीस असे म्हणतात. अनेक रुग्णांना अपेंडिक्सचे दुखणे उद्भवते, या दुखण्यावर त्यांना शस्त्रक्रिया करून घेण्याखेरीज दुसरा मार्गही नसतो. अपेंडिसायटीसमध्ये संसर्गग्रस्त विषाणू रक्ताच्या माध्यमातून शरीराच्या अन्य भागात पसरतात. ही व्याधी वेळीच उपचार करून आटोक्यात आणली नाही तर गंभीर रूप धारण करू शकते. ( Appendicitis )

पोटात वारंवार दुखणे, भूक मंदावणे, वारंवार मळमळणे, उलटी होणे, ही अपेंडिसायटीसची लक्षणे सांगितली जातात. शस्त्रक्रिया करून अपेंडिक्सवर उपचार केले जातात. शस्त्रक्रिया केल्यानंतर अपेंडिक्सचा जो भाग शरीरात राहिलेला असतो, त्या भागाला अनेक कारणांमुळे सूज येऊ शकते. म्हणूनच ज्यांनी अपेंडिक्सची शस्त्रक्रिया केली असेल त्यांना कालांतराने हे दुखणे पुन्हा त्रास देऊ शकते. अपेंडिसायटीसवर सुद्धा शस्त्रक्रिया केली जाते. ( Appendicitis )

त्या रुग्णाला पुन्हा अपेंडिसायटीसच्या व्याधीचा त्रास होऊ शकतो. अपेंडिसायटीसवर शस्त्रक्रिया करताना त्या भोवतालच्या भागाला संसर्ग होऊ शकतो. संसर्ग झाल्यामुळे तो भाग सुजतो. दुखू लागतो. वेदना असह्य झाल्यावर त्यावर शस्त्रक्रिया करणे भाग पडते. याचाच अर्थ अपेंडिसायटीसची व्याधी शस्त्रक्रियेमुळे पूर्णपणे बरी होऊ शकते असे नाही. काही वेळा त्या भागाला झालेले इन्फेक्शन इतक्या गंभीर स्वरूपाचे असते की, तो भाग शस्त्रक्रियेनंतर शिवता येत नाही. अशावेळी पॅन्टीबायोटिक्स थेरपीद्वारे इन्फेक्शन कमी केले जाते. इन्फेक्शन पूर्णपणे संपल्यावरच तो भाग शिवला जातो.

डॉ. सुनील जाधव

SCROLL FOR NEXT