Latest

Anupamaa fame Rupali Ganguly : संघर्षाच्या काळात पडेल ते काम करावं लागलं; रुपाली गांगुलीची भावूक करणारी कहाणी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क – प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीने सांगितले की, 'माझे कधी कोणतेच स्वप्न नाही राहिले. मी कोणतेही स्वप्न पाहिलं नाही. (Anupamaa fame Rupali Ganguly) मला इतकचं वाटायचं की, माझे वडील नगरपालिकेच्या रुग्णालयात ॲडमिट होऊ नयेत. मला वाटायचं की, ते लीलावती सारख्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावेत. यासाठी गरज होती की, मी मिळेल ते काम करावं.' (Anupamaa fame Rupali Ganguly)

रिपोर्टनुसार, ४६ वर्षीय रुपालीने एका वेबसाईटशी सांगितलं की, 'मला वाटतं की, मी आणि माझा भाऊ, आम्ही दोघे जे काही छोटं-मोठं काम मिळेलं, ते सन्मानाने स्वीकारलं. मी माझ्या वडिलांसाठी काहीही करू शकतो. ते माझे भगवान आहेत आणि ते आतादेखील आहेत.'

वडिलांनी घेतली नव्हती कोणाचीही मदत…

रुपाली जेव्हा संघर्ष करत होती, तेव्हा तिच्या वडिलांनी कुणाच्याही कॉन्टॅक्टने मदत घेतली नाही. आता अभिनेत्रीने आभार व्यक्त केलं आहे. तिचे म्हणणे आहे की, आज ती ज्या पातळीवर आहे, तिने झिरो पासून सुरुवात केली. 'टीव्हीवर जो देखील वेळ मिळायचा, शानदार परफॉर्म करायचो, जेव्हा याविषयी लिहिलं जायचं, तेव्हा हे माझे अचीव्हमेंट आहे, विजय आहे , असे वाटायचे. ही सोपी इंडस्ट्री नाही.'

रुपालीच्या वडिलांच्या २ चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार

रुपालीचे वडील दिग्दर्शक आणि स्क्रीनरायटर होते. त्यांनी हिंदी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये ७० चे दशक ते २००१ पर्यंत काम केलं. त्यांना जया बच्चन यांचा चित्रपट 'कोरा कागज' साठी ओळखले जाते. 'तपस्या' चित्रपटाचेही खूप कौतुक झाले, या चित्रपटात सदाबहार रेखा यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या दोन्ही चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

SCROLL FOR NEXT