Latest

Iffi 2023 : जसा समाज समृद्ध होईल तशी असमानता कमी झाली पाहिजे : अँटोनियो फरेरा

अनुराधा कोरवी

पणजी : प्रभाकर धुरी :  समाज जस-जसा समृद्ध होत जाईल तशी असमानता कमी व्हायला हवी, पण तसे होताना दिसत नाही, असे पोर्तुगीज चित्रपट 'बेला' अमेरिकाचे दिग्दर्शक अँटोनियो फरेरा यांनी सांगितले. बुधवारी रोजी इफ्फी महोत्सवामध्ये (Iffi 2023 ) सिनेमा 'ऑफ द वर्ल्ड' श्रेणी अंतर्गत त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शन झाले. यानंतर त्यांनी आज गुरूवारी (दि.२३) रोजी इफ्फीमध्ये प्रसार माध्यमे, प्रतिनिधी आणि सिने रसिकांशी मनमुराद संवाद साधला.

संबंधित बातम्या 

चित्रपटाच्या माध्यमातून असमानता कमी करण्याचा मुख्य संदेश देण्यासाठी 'बेला' अमेरिका हा चित्रपट अन्न, लोकानुनय आणि विनोदाच्या संकल्पनेवर आधारित आहे, असे अँटोनियो फरेरा यांनी सांगितले. मानवी सन्मान सर्वोपरी आहे. अशा जगात, समतावादी समाजाच्या दिशेने आपल्या प्रगतीमध्ये अडथळा आणणाऱ्या सर्वव्यापी सामाजिक असमानता दूर करणे अत्यावश्यक आहे असे मत दिग्दर्शक अँटोनियो यांनी व्यक्त केले.

या चित्रपटाद्वारे, दिग्दर्शकाने सामूहिक जाणीवेला प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो, जिथे समानता ही केवळ आकांक्षा नसून एक जिवंत वास्तव आहे. तसे जग निर्माण करण्यासाठी आवश्यक ती दरी भरून काढण्याचे आवाहन त्यानी यावेळी केले आहे.

सखोल सामाजिक संदेश देण्यासाठी विनोदी ढंगाचा वापर करण्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, विनोद हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो त्यांच्या चित्रपटात प्रतिबिंबित होतोच. आजच्या धकाधकीच्या जीवनात, प्रेक्षकांना गंभीर आणि उपदेशात्मक संदेश देण्याऐवजी विनोदी आशय वापरणे सोपे वाटते, असे मत फरेरा यांनी व्यक्त केले. ( Iffi 2023 )

SCROLL FOR NEXT