Latest

Antibiotics for Babies : ‘बालपणी दिलेले अँटीबायोटीक्स तरुणपणी ठरतात अपायकारक! : मेलबर्न विद्यापीठाचे संशोधन

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  आजारी लहान मुलांना अँटीबायोटीक्स ( प्रतिजैविक) देण्यात येतात.  मात्र ज्या मुलांना लहानपणी अँटीबायोटीक्स दिली जातात त्यांना  प्रौढ झाल्‍यानंतर आतड्यांसंबंधी समस्‍या निर्माण होण्याची शक्यता असते, असा निष्‍कर्ष ऑस्‍ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठात झालेल्‍या संशोधनात काढण्‍यात आला आहे. यासंदर्भातील संशोधन उंदरांवर करण्‍यात आले.
( Antibiotics for Babies ) यामध्‍ये आढळले की, ज्या बालकांना अँटीबायोटिक्‍स दिले गेले त्‍यांना मोठे झाल्‍यावर पचनासंबंधित विकार होण्‍याची शक्‍यता अधिक असते.

या संशोधनावरील लेख 'द जर्नल ऑफ फिजियोलॉजी'मध्‍ये प्रकाशित झाला आहे. संशोधनावेळी असे आढळले की, नवजात उंदरांना अँटीबायोटीक्स देण्‍यात आले. यानंतर स्‍पष्‍ट झाले की, उंदरांच्‍या मज्‍जासंस्‍था आणि आतड्याच्‍या कार्यावर याचा दीर्घकाळ परिणाम होतो.

Antibiotics for Babies : अंतस्‍थ मज्‍जासंस्‍थवर दीर्घकालीन परिणाम होवू शकतो

या संशोधनासंदर्भात वृत्तसंस्‍था 'पीटीआय'शी बोलताना प्रमुख संशोधक डॉ. जॅमे फूंग यांनी सांगितले की, "बाळाला जर जन्‍मानंतर अँटीबायोटीक्स देण्‍यात आले तर त्‍याच्‍या अंतस्‍थ मज्‍जासंस्‍थवर दीर्घकालीन परिणाम होवू शकतो. हे दाखवणाऱ्या आमच्या अभ्यासाच्या पुढील निष्कर्षांबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत."

मेलबर्न विद्यापीठाच्‍या संशोधनात उंदरांना १० दिवस सलग व्‍हॅनकोमायसिन या अँटीबायोटीक्‍सचा दररोज तोंडी एक डोस देण्‍यात आला. यानंतर सलग सहा आठवडे त्‍यांचे संगोपन करण्‍यात आले. यावेळी असे आढळले की, नवजात अर्भकाला अँटीबायोटीक्‍स दिलेल्‍या काही दिवसांनंतर प्रौढ उंदीर मादी व नर यांच्‍या उंदरांच्‍या आतड्याच्‍या कार्यामध्‍ये भिन्‍नता येते.

SCROLL FOR NEXT