Latest

Anti-Copying Act Uttarakhand : परीक्षेमध्ये कॉपी केल्यास १० वर्षे कारावास आणि १० लाख दंड

मोहन कारंडे

डेहराडून : वृत्तसंस्था : उत्तराखंडमध्ये कॉपीविरोधी कायदा कठोर करण्यात आला आहे. तसा अध्यादेश जारी करण्यात आला असून, राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंह यांनी शुक्रवारी त्यावर शिक्कामोर्तब केले. 'उत्तराखंड स्पर्धा परीक्षा अध्यादेश २०२३' असे नाव या कायद्याला देण्यात आले आहे.

अध्यादेश लागू झाल्यानंतर कुणीही विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेला तर त्याला ३ वर्षे कारावास आणि ५ लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. हाच विद्यार्थी पुन्हा पकडला गेला, तर १० वर्षे कारावास आणि १० लाख रुपये दंड भरावा लागेल.

SCROLL FOR NEXT