Latest

सौर मंडळात लपला आहे पृथ्वीसारखा आणखी एक ग्रह?

Arun Patil

वॉशिंग्टन : कित्येक वर्षांपासून जगभरातील खगोलशास्त्रज्ञ सौर मंडळातील आणखी एका विश्वाचा शोध घेत आहेत, ज्याला एरवी प्लॅनेट नाईन असे संबोधले जाते. हा ग्रह पृथ्वीसारखाच एक असेल आणि आपल्यापासून जवळ असेल, अशी आख्यायिका आहे. जपानच्या खगोल शास्त्रज्ञांनी हा नवा ग्रह कुईपर बेल्टमध्ये लपला असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. कुईपर बेल्ट ही अशी जागा आहे, ज्याने सौर मंडळाला चारही बाजूने घेरलेले आहे. हा ग्रह पृथ्वी व सूर्य यांच्यातील अंतराच्या 500 पटीने अधिक अंतरावर असेल, असा या शास्त्रज्ञांचा दावा आहे.

हा ग्रह पृथ्वीपासून तिपटीने मोठा असेल, असाही या तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र, हा ग्रह इतका अति थंड असेल की, तिथे जीवनमान असण्याची शक्यता खूपच विरळ असणार आहे. जपानमधील ओसाका येथे किंडाई विद्यापीठातील पॅट्रिक सोफिया व टोकियोतील जपानी वेधशाळा ताकाशी इटो यांनी हे संशोधन केले आहे. द अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल जर्नलमध्ये प्रकाशित आपल्या रिसर्च पेपरमध्ये त्यांनी पृथ्वीसारखा ग्रह अस्तित्वात असू शकतो, अशी भविष्यवाणी केली आहे.

कुईपर बेल्टमध्ये कोट्यवधी बर्फाळ पिंड आहेत व त्यांना ट्रान्स नेपच्युनियन ऑब्जेक्टस असे म्हटले जाते. याचे कारण असे की, कुईपर बेल्ट नेपच्यून ग्रहाच्या बाहेर आहे. ट्रान्स नेपच्युनियन ऑबजेक्टस सौर मंडळाच्या निर्मिती प्रक्रियेतून वाचलेला एक घटक मानला जातो. याची कक्षा बाहेरील सौर मंडळाच्या अज्ञात ग्रहाचे संकेत देते, असे जपानी शास्त्रज्ञांचा दावा आहे. यातील काही कक्षा इतक्या अजब आहेत की, त्यांना पाहूनच एखादा घटक त्यांना प्रभावित करत असल्याचे सुस्पष्ट होते.

कुईपर बेल्ट ग्रहाचे अस्तितत्व असल्याची पुष्टी करत असल्याने ही भविष्यवाणी केली जात आहे. मात्र, यासाठी आणखी संशोधन क्रमप्राप्त असणार आहे. आता ज्या ग्रहाची भविष्यवाणी केली आहे, तो ग्रह प्लॅनेट नाईनपेक्षा वेगळा आहे. प्लॅनेट नाईनची संकल्पना यापूर्वीही मांडण्यात आली. पण, आताही त्याचे अस्तित्व अनेक जण नाकारत आले आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

SCROLL FOR NEXT