Latest

पुणे : नाट्यगृहांच्या वार्षिक उत्पन्नात घट, उपनगरात प्रतिसाद कमी; सुविधांचा अभाव कायमच चर्चेचा विषय

अमृता चौगुले

 पुणे : शहरातील महापालिकेच्या नाट्यगृहांच्या उत्पन्नात घट झाली आहे. पालिकेच्या सर्व 14 नाट्यगृहांचे मिळून दरवर्षी सुमारे 5 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट असते. पण, यंदा मात्र एप्रिल 2022 ते मार्च 2023 या एका वर्षात फक्त 3 कोटी 6 लाख 11 हजार 412 रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, गणेश कला क्रीडा मंच आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह यांनी सर्वाधिक कमाई केली आहे. तर दुसरीकडे उपनगरातील काही नाट्यगृहांनी वर्षभरातील काही महिन्यांमध्ये शून्य उत्पन्न मिळवले आहे. या नाट्यगृहांचे वार्षिक उत्पन्नही काही हजारातच आहे.

पालिकेच्या मोजक्याच नाट्यगृहांनी चांगले उत्पन्न मिळविले आहे. परंतु, उपनगरातील नाट्यगृहांना फारसा प्रतिसाद नसल्याने गेल्या वर्षभरात त्या नाट्यगृहांचे उत्पन्न घटले आहे. त्यात आता नाट्यगृहांमध्ये सोयीसुविधांचा अभाव हा चर्चेचा विषय ठरत आहे.

एप्रिल 2022 ते मार्च 2023 या वर्षांत उत्पन्न कमी असले तरी यंदाच्या वर्षी उत्पन्न वाढले ही जमेची बाजू आहे. कारण सध्या नाट्यगृहांमधील नाटकांचे प्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्या वाढली आहे. त्यामुळे चालू वर्षांत नक्कीच 5 कोटींचे उद्दिष्ट गाठता येईल, असे वाटते.

– विजय शिंदे, मुख्य व्यवस्थापक, बालगंधर्व रंगमंदिर

शहरातील 14 नाट्यगृहे आणि त्यांचे उत्पन्न

(कालावधी एप्रिल 2022 ते मार्च 2023 )

1) बालगंधर्व रंगमंदिर – 98 लाख 551

2) गणेश कला क्रीडा मंच (स्वारगेट) – 52 लाख 15 हजार 544

3) यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड) – 40 लाख 52 लाख 759

4) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक (बिबवेवाडी) – 27 लाख 60 हजार 552

5) महात्मा फुले सांस्कृतिक भवन (वानवडी) – 25 लाख 66 हजार 254

6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन – 6 लाख 86 हजार 865

7) मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक (कोरेगाव पार्क) – 2 लाख 8 हजार 406

8) पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन (घोले रस्ता) – 18 लाख 34 हजार 301

9) पं. भीमसेन जोशी कलामंदिर (औंध) – 12 लाख 89 हजार 840

10) सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन (गंज पेठ) – 4 लाख 98 हजार 244

11) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन – 1 लाख 79 हजार 810

12) पं. भीमसेन जोशी कलादालन (सहकारनगर) – 91 हजार 704

13) राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल विजय तेंडुलकर नाट्यगृह – 2 लाख 716

14) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे कलामंदिर (येरवडा) – 12 लाख 25 हजार 866

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT