Latest

Jawan Movie : ‘जिंदा बंदा’ गाण्यावर १५ कोटी खर्च! एसआरकेचा हजारो तरुणींसोबत डान्स

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपटातील अॅक्शन आणि साहसी दृश्य दाखविणाऱ्या 'जवान' चित्रपटाची दीर्घकाळ चर्चा आहे. आता अनिरुद्धने संगीतबद्ध केलेल्या डान्स नंबर चर्चेत आला आहे. यामागे दोन कारणे आहेत. (Jawan Movie) एक म्हणजे शाहरुख खानचे जिंदा बंदा या गाण्यावर १५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. दुसरे म्हणजे शाहरुख खानने १ हजार तरुणी नृत्यांगनांसोबत जिंदा बंदा गाण्यावर डान्स केला आहे. ही पहिलीच वेळ असेल की, एका गाण्यावर इतके कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. (Jawan Movie)

मीडिया रिपोर्टनुसार, "अनिरुद्ध आणि नृत्यदिग्दर्शक शोबी यांनी जिंदाबंदाची कल्पना केली. या गाण्याचे चेन्नईमध्ये पाच दिवस चित्रीकरण करण्यात आले होते. यामध्ये हैदराबाद, बंगळुरू, मदुराई, मुंबई येथून १ हजारांहून अधिक नृत्यांगना आल्या होत्या. या गाण्याची निर्मिती १५ कोटींहून अधिक बजेटमध्ये केली गेली."

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचे चाहते त्याच्या 'जवान' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'जवान'चे जोरदार प्रमोशनही सुरू आहे. पहिले गाणे जिंदा बंदा रिलीज होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गाणे बनवण्यासाठी १५ कोटी रुपये इतका मोठा खर्च आला आहे.

अनिरुद्धने हे गाणे गायलेदेखील आहे, शोबीने स्टेप्स कोरिओग्राफ केलं आहे. गाणे कितीही भव्य असेल, याबाबतची उत्सुकता फॅन्समध्ये आहे. असे म्हटले जात आहे की, या गाण्यात अभिनेत्री प्रियामणि अथवा अन्य साऊथ स्टारचा कॅमियोदेखील असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT