Latest

Anil Kapoor No Entry : अनिल कपूर ‘नो एन्ट्री’मध्ये दिसणार नाही, काय म्हणाले बोनी कपूर?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी स्पष्ट केले आहे की 'नो एंट्री २' च्या सिक्वेलमध्ये मेगास्टारला कास्ट का नाही केलं? त्याचबरोबर अनिल कपूर त्यांच्यावर "रागावर आहेत" अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली होती. पण याबद्दल बोनी यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. "मला धक्का बसला आणि आश्चर्य वाटले की पत्रकारांनी अतिशय हा मुद्दा खूप गंभीरपणे घेतला, असे ते म्हणाले. (Anil Kapoor No Entry) जेव्हा मी म्हटलं की, अनिल माझ्यावर रागावला आहे तेव्हा वस्तुस्थिती अशी आहे की मी ज्या चित्रपटाचा प्रस्ताव देत आहे त्यात सलमान (खान) किंवा अनिल नाही कारण ते दोघेही खूप व्यस्त अभिनेते आहेत. त्यामुळे, त्यांच्यासोबत चित्रपट बनवण्याचा विचार करण्याऐवजी मी तरुण पिढीसोबत सिक्वेल बनवण्याचा निर्णय घेतला, असे बोनी कपूर म्हणाले. (Anil Kapoor No Entry)

ते पुढे म्हणाले, "त्यापैकी कोणीही माझ्यावर नाराज होऊ शकते. कारण ते 'नो एंट्री'च्या सिक्वेलचा भाग नाहीत, असा विचार करणे ही कल्पना पूर्णपणे मूर्ख आणि हास्यास्पद आहे. नो एन्ट्री सिक्वेलला त्यांची गरज भासेल पण त्यांना सिक्वेलची गरज नाही. ही टिप्पणी स्पष्टपणे केवळ विनोदाने बोलली गेली आहे." बोनी म्हणाले की, अनिल "एक व्यस्त स्टार आहे. मला माहीत आहे की पुढची दोन वर्षे अनिलकडे अजिबात तारखा उपलब्ध नाहीत."

वर्क फ्रंटवर अनिल कपूर सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित त्याच्या आगामी 'सुभेदार' चित्रपटात दिसणार आहे.

SCROLL FOR NEXT