पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावरून अत्यंत वादग्रस्त विधान करत नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत आज वेगळ्याच आणि खळबळजनक मुद्द्यावरून मनोरंजन विश्वात चर्चेत आली आहे. ३४ वर्षांची असणारी आणि सिंगल कॅटेगरीत मोडणारी कंगना ही हृतिक रोशनच्या प्रेमसंबंधांवरूनही चर्चेचा विषय ठरली होती. समवयस्कतेचा विचार करता हृतिक रोशन आणि कंगना राणावत यांच्यातील प्रेमाची चर्चा ठीक हाेती; पण आता चक्क वडिलांच्या वयाचा एक प्रसिद्ध अभिनेता कंगनाशी लग्न करण्यासाठी बायको घटस्फोट देण्यास तयार झाला होता. (Kangana And Anil)
बाॅलीवूडमधील चिरतरुण अभिनेता (Kangana And Anil) अशी अभिनेता अनिल कपूर याची ओळख झाली आहे. ताे कंगनाशी लग्न करण्यासाठी आपल्या बायकोला सोडायला तयार झाला होता. 'काॅफी विथ करण' या रिएलिटी शोमध्ये स्वतः अनिल कपूरने हा खुलासा केलेला आहे. या शोमध्ये करण जोहरने अनिल कपूरला एक प्रश्न विचारला होता.
तो प्रश्न असा होता की, "अशा एका महिलेचं नाव सांगा, जिच्यासाठी तुम्ही तुमच्या बायकोला म्हणजे सुनिता कपूरला यांना सोडू शकता." या प्रश्नांचं उत्तर देताना अनिल कपूरने चक्क कंगनाचं नाव घेतलं. आता हा मुद्दा गमतीचा होता; पण माध्यमविश्वात आणि मनोरंजन विश्वात हा किस्सा जास्त काळ चर्चेत राहिला.
सुनिता कपूर आणि अनिल कपूर यांचं लग्न १९८४ मध्ये झालं होतं. सुनिता त्यावेळी माॅडेलिंग करत होत्या. अनिल कपूरनेदेखील बाॅलिवुडमध्ये नुकतीच सुरूवात केली होती. सध्या सुनिता काॅस्ट्यूम डियाझनर आहेs. त्यांना सोनम, रिया आणि हर्षवर्धन अशी तीन मुलं आहेत. सोनम आणि हर्षवर्धन अभिनयात करिअर करत आहेत. तर, रिया ही निर्माती म्हणून काम करत आहे.
हे वाचलं का?