Latest

Anil Kapoor : मिस्टर इंडिया परत येतोय? अनिल कपूरच्या इन्स्टा अकाऊंटवरून सर्व पोस्ट गायब

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनिल कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सर्व पोस्ट डिलीट केले आहेत. शिवाय डीपीदेखील हटवला आहे. पण, अभिनेत्याने उचललेल्या या पावलामुळे त्यांचे फॅन्स चिंतेत पडले आहेत. (Anil Kapoor) इन्स्टाग्रामवर अनिल कपूर यांचे ५.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. तरीही त्यांनी पोस्ट डिलीट करण्याचा निर्णय घेतला आणि इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट हटवले. काही जण हा प्रकार 'मिस्टर इंडिया २' शी जोडत आहेत. (Anil Kapoor)

संबंधित बातम्या –

एका रिपोर्टनुसार, अनिल कपूर अशा प्रकारे सोशल मीडियावरून अचानक गायब होणे हे 'मिस्टर इंडिया २' सुरू होण्याची मोठी हिंट आहे. मिस्टर इंडिया (१९८७) मधील भूमिकेप्रमाणे अनिल कपूरदेखील अचानक सोशल मीडियावरून गायब झाले.

anil kapoor

मीडिया रिपोर्टनुसार, बोनी कपूर यांना माहिती नाहीये की, अनिल कपूर के इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केले आङेत. ते म्हणाले की, 'मी आधी पाहतो. मी आतापर्यंत स्वत: पाहिलेले नाही. परंतु, हो त्याने सांगितलं होतं की, तो काहीतरी दाखवणार आहे'. 'मिस्टर इंडिया २' विषयी बोनी कपूर म्हणाले की, 'मला नाही वाटत की मी 'मिस्टर इंडिया २' ची घोषणा करू शकेन'.

या प्रकारावर सोनम कपूरने आपल्या स्टोरीवर वडिलांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचे स्क्रीनशॉट घेऊन विचारले की, 'डॅड??'. तसेच जावई आनंद आहूजानेदेखील पोस्ट शेअर करून अपेक्षा व्यक्त केलीय की, काहीतरी नवं घडणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT