Latest

४९ महिलांचे मुडदे पाडणारा सिरियल किलर पॅरोलसाठी पात्र; कॅनडात संतप्त प्रतिक्रिया

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅनडातील सिरियल किलर रॉबर्ट पिक्टन हा पॅरोलसाठी पात्र ठरला आहे. रॉबर्ट पिक्टन २००७पासून तुरुंगात आहे. रॉबर्टने ४९ महिलांचे खून केले होते आणि तो या महिलांचे मांस त्याच्या पाळीव डुकरांना खायला घालत असे. रॉबर्ट पिक्टन याच्या संभाव्य पॅरोलवरून कॅनडात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

रॉबर्ट पिक्टन यांच्यावर २००७ला सहा महिलांच्या खुनाबद्दलचे दोषारोप सिद्ध झाले होते, तेव्हापासून तो तुरुंगात आहे. पिक्टन यांने ४९ महिलांचे खून केल्याचे सांगितले जाते. या महिलांचे DNA पिक्टनच्या पिग फार्मशी जोडता आले होते. पण पिक्टन या आधीच जास्तीजास्त शिक्षा भोगत असल्याने त्यांच्यावर दुसरे खटले चालवण्यात आले नाहीत. पिक्टनला सर्वप्रथम २२ फेब्रुवारी २००२ला अटक झाली होती, त्यामुळे तो २०२७ पॅरोलसाठी पात्र होणार आहे.

कॅनडातील लोकप्रतिनिधी पियरे पॉईलेव्हेर यांनी यावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. एक्स पोस्टमध्ये ते म्हणाले, "रॉबर्ट पिक्टनसारखे राक्षस समाजात खुले फिरता कामा नयेत. असे गुन्हेगार फक्त शवपेटीतूनच बाहेर आले पाहिजेत." तेथील आणखी एक नेते रॉब मूर म्हणतात, "रॉबर्ट पिक्टन पॅरोलसाठी कधीही पात्र ठरू नये. तो तुरुंगातून बाहेर येणे म्हणजे पीडितांवर आघात केल्यासारखे होईल. "

SCROLL FOR NEXT