Latest

Salman Khan : अनंत अंबानी सलमानला उचलून घेण्याच्या प्रयत्नात मात्र, असं काही घडलं की…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्योगपती अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवशीय प्री-वेडिंग सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला देश-विदेशातील अनेक बॉलिवूड कलाकारांनी मोठ्या दिमाकात एन्ट्री केली. या कार्यक्रमात बलिवूड अभिनेता सलमान खान, शाहरूख कान आणि आमिर खानच्या एकत्रित परफार्मन्सने उपस्थिताची मने जिंकली. तर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहच्या जोडीचीही एक विशेष चर्चा झाली. दरम्यान अनंत अंबानीने एका गाण्याव डान्स करताना चक्क सलमानला ( Salman Khan ) उचलण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्याला उचलता न आल्याने एकच हास्य कल्लोळ झाला. हा मजेशीर व्हिडिओ सध्या जोरदार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

या प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये अनंत अंबानी आणि बॉलिवूड अभिनेता स्टेजवर उभारलेले असतात. यावेळी पाठीमागे संगीत वाजत असते. दरम्यान अनंत याला आनंदाने खूश होवून सलमान खानला उचलून खांद्यावर घेवून डान्स करायचा असतो. याप्रमाणे अनंत अंबानी सलमानला उचलण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याला पुर्णपणे उचलता येत. यानंतर तो सलमानच्या बॉडीगार्डला इशारा करतो आणि बॉडीगार्ड शेरा स्टेजवर येतो आणि सलमानला आरामात उचलून खांद्यावर घेतो. याच दरम्यान पाठीमागे भांगडा नृत्य चालू असतो. यावरही सगळेजण डान्स करत असतात.

दरम्यान सलमान ( Salman Khan ) आणि अंबानी दोघेजणही मोठ्याने हसतात. सलमान आणि अनंत अंबानी यांच्यातील हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून सलमानच्या चाहत्यांनी दोघांमधील बॉन्डिंग सुंदर असल्याचे म्हटलं आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा तीन दिवसांचा प्री-वेडिंग सोहळा ३ मार्च रोजी संपला आहे. या सोहळ्यातील तिन्ही दिवस वेगवेगळ्या थीमवर पार्ट्या झाल्या. ज्यामध्ये हॉलिवूड स्टार्स रिहाना आणि एकॉन याच्यासह बॉलिवूड स्टार्स दिलजीत, अरिजित आणि श्रेया घोषाल आणि कलाकारांनी परफॉर्म केले आहे. नीता अंबानी यांचाही विशेष परफॉर्मन्स केला होता.

(video : varindertchawla and bollywood_official instagram वरून साभार)

SCROLL FOR NEXT