Latest

कोल्हापूर विमानतळाच्या लुकची आनंद महिंद्रांनाही भूरळ

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : एकेकाळचा उदासीबुवाचा माळ आज हायटेक एअरपोर्ट झाला आहे. कोल्हापूर विमानतळाचे रुपडे पालटताना अत्याधुनिक सोयीसुविधा आणि यंत्रसामग्रींनी तो सज्ज आहे. विशेष म्हणजे ही इमारत साकारताना कोल्हापूरची ऐतिहासिक परंपराही जपण्यात आली आहे. नव्या टर्मिनल इमारतीला आकर्षक हेरिटेज लुक देण्यात आला आहे. विमानतळाच्या अस्सल कोल्हापूरी ऐतिहासिक लूकची उद्योजक आनंद महिंद्रा यांनाही भूरळ पडली आहे.

कोल्हापूर विमानतळाचा हा नवा लुक सध्या इंटरनेटवर ट्रेंडिंग आहे. या नव्या लुकचे फोटो उद्योजक आनंद महिंद्रा यांनी एक्स पोस्टवर शेअर करत खास संदेशही लिहिला आहे. या नव्या ऐतिहासिक लुकबद्दल आदर आहे, असे सांगत स्टील, काच आणि क्रोमवर्कवर आधारित असेंब्ली-लाईन विमानतळाचे डिझाइन न करता स्थानिक इतिहास आणि स्थापत्यकलेवर आधारित एक वेगळी ओळख निर्माण करणारा विमानतळ उभारण्यात आल्याचे आपल्या पोस्टमध्ये महिंद्रा यांनी म्हटले आहे.

येणार्‍या काळात कोल्हापूर विमानतळावरुन मोठ्या शहरांमध्ये कनेक्टिव्हीटीही सुरु होणार आहे. विमानतळ विस्तारीकरणाच्या कामासाठी केंद्र सरकारकडून 272 कोटींचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. तसेच नव्या टर्मिनल इमारतीचेही काम करण्यात आले. टर्मिनल इमारतीसाठी 72 कोटींचा निधी देण्यात आला होता. या निधीतून इमारतीला नवा ऐतिहासिक लूक देण्यात आला आहे.

आकर्षक प्रवेशद्वार

छत्रपती राजाराम महाराज यांच्या दूरदृष्टीतून स्वातंत्र्यपूर्वकाळातच कोल्हापूरात विमानतळ उभारण्यात आला आणि 5 जानेवारी 1939 ला पहिल्या विमानाने झेप घेतली. आता या नव्या विमानतळाच्या प्रवेशद्वाराचा ऐतिहासिक लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विमानतळाच्या इमारतीच्या प्रवेशद्वारासाठी मराठा साम—ाज्यातील ऐतिहासिक स्थळे, गडकोट यांच्यासाठी वापरण्यात आलेला दगडाचा वापरण्यात करुन आकर्षक प्रवेशद्वार तयार करण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT