Latest

Aamy Jackson : होसाना फेम एमी जॅक्सनचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, अयशस्वी ठरली प्लास्टिक सर्जरी?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रतीक बब्बरसोबत 'एक दिवाना था'मध्ये, अक्षय कुमारसोबत 'सिंह इज ब्लिंग' मध्ये अभिनय साकारणाऱ्या एमी जॅक्सनचा लूक बदलला आहे. तिचे जे फोटो व्हायरल झाले आहेत, त्या फोटोजमधील लूक पाहून ओळखणे कठीण होत आहे की, ती एमी जॅक्सन आहे. (Aamy Jackson) एमी आणि प्रतीक बब्बरचे गाणे होसाना खूपचं लोकप्रिय ठरले होते. यामध्ये दिसणारी एमी (Aamy Jackson) इतकी सुंदर आहे की नेटकरी तिची तुलना आताच्या लूकशी करत आहेत. तिचा बदललेला लूक पाहून काही नेटकऱ्यांनी तिला ओपनहायमर (Oppenheimer) च्या किलियन मर्फी (Cillian Murphy) ची आठवण होत असल्याचे म्हटले आहे. तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून तिला ओळखणे खरचं कठीण झाले आहे.

नेटकऱ्यांची किलियन मर्फीशी तुलना

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एमी जॅक्सनच्या फोटोवर लोक खूप कमेंट्स करत आहेत. लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत. जर यावर सर्व कॉमेंट्सविषयी सांगायचे झाले तर एकाने लिहिले, 'अयशस्वी सर्जरी…प्लास्टिक थोडं अधिक झालं.' दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, 'विश्वास होत नाहीये की, ही पहिल्या चित्रपटातील एमी आहे. मागील दशकात ही अभिनेत्री खूप सुंदर होती. तिसऱ्याने लिहिलं, 'माझे क्रश आता क्रश राहिले नाही. जेव्हापासून 'होसाना' पाहिला होता, तेव्हापासून फॅन होतो. पण आता नाही.' काहींनी तिची तुलना 'ओपनहायमर'च्या किलियन मर्फीशी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT