Latest

अमृता अरोराचे पतीसोबत अंडरवॉटर किसींग; चाहते म्हणाले राज कुंद्रा काय करतोय तिथं ! (video)

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन 

बॉलीवूड अभिनेत्री अमृता अरोराने (Amrita Arora) पती सोबतih एक रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत, नवीन अंदाजात व्हॅलेंटाईन डे साजरा केला. हा फाेटाे सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बॉलीवूड स्टार आपआपल्या अंदाजात व्हॅलेंटाईन डे साजरा करताना दिसले. अमृताची बहीण बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत एक रोमँटिक फोटो शेअर केला हाेता. ताेही सोशल मीडियावर माेठ्या प्रमणावर व्‍हायरल झाला.

अभिनेत्री अमृता अरोराने (Amrita Arora) शकीलसोबत पाण्याखाली किस केलला एक रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर केला. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या केमिस्ट्रीचे जोरदार कौतुक करत, तर काहींनी संमिश्र प्रतिक्रीयाही व्यक्त केल्या.  सोशल मीडियावरील प्रतिक्रीयांमध्ये एका यूजरने लिहिले, 'रॉकिंग व्हॅलेंटाईन्स…'. एका यूजरने लिहिले आहे की, 'मला वाटले हा राज कुंद्राच आहे.' तर तिथे आणखी एका यूजरने लिहिले आहे, 'शिल्पा शेट्टी हे बघ अंडरवॉटर राज कुंद्रा काय करत आहे?'

बॉलीवूड अभिनेत्री अमृता अरोरा (Amrita Arora) आणि शकीलचे रोमँटिक छायाचित्र पाहून काही लोकांना असे वाटू लागले की, या  अमृता अरोरासोबत शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच आहे. याबद्दल एका नेटिझन्सने अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही तक्रार केली आहे. अशाप्रकारे नेटिझन्सनी अमृता अरोराचा ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

अमृता अरोरा आणि शकील लडक यांचे लग्न
अमृता अरोरा (Amrita Arora) आणि शकील लडक यांचे २००९ मध्ये लग्न झाले हाेते. दोघांनी पहिला ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले त्यानंतर पंजाबी आणि हिंदू पद्धतीने लग्न केले आहे . शकील हा लडक कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीशी संबंधित आहे. त्‍यांना दोन मुलेही आहेत.

हेही वाचलत का ?

SCROLL FOR NEXT