Latest

अमरावती : सम्मेद शिखरजी तीर्थस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याविरोधात जैन समाजाचा मूक मोर्चा

अविनाश सुतार

अमरावती: पुढारी वृत्तसेवा : झारखंड सरकारने जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सम्मेद शिखरजी तीर्थस्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचे प्रस्तावित केले आहे. झारखंड सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात अमरावतीत आज ( दि.२३) सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मूक मोर्चा काढण्यात आला. श्री सम्मेद शिखरजी तीर्थस्थळ कायम ठेवावे, अशी मागणी जैन समाजाने केली आहे.

जैन धर्माचे प्राचीन तसेच पवित्र शाश्वत सिद्ध क्षेत्र असलेले श्री सम्मेद शिखरजी तीर्थस्थळाला झारखंड सरकारने २०१९ मध्ये गॅजेट नोटीफिकेशन मध्ये इको सेन्सिटिव्ह झोन आणि ट्रांसिट स्पॉट घोषित केले आहे. याचा अमरावती येथील सकल जैन समाजाने विरोध केला आहे. श्री सम्मेद शिखरजी येथील पवित्रता कायम राहावी, म्हणून या ठिकाणी कोणतेही हॉटेल सुरू होऊ नये. या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे अवैध बांधकाम न होता येथील पर्यावरण अबाधित राहावे, असे निवेदनात नमूद करून जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या माध्यमातून राष्ट्रपती, पंतप्रधान, झारखंडचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

यावेळी ब्रंसदीप भैय्याजी, निलेश मुनी, सजल जैन, राजेंद्र बन्नोरे, सचिन जैन, निलेश कळमकर, अंकित जैन, रोहन देवलसी, शैलेंद्र जैन, योगेश विटाळकर, विवेक फुलंबरकर, मुकेश जैन, आनंद वारकरी, नकुल फुलाडी, किशोर नखाते, गौरव चोपडा, प्रतीक सिंघई, स्वप्निल सिंघई, रितेश जैन, महानगर चेंबरचे अध्यक्ष सुरेश जैन, अभिनंदन पेंढारी, लता सिंघई, परवार महिला मंडळ, वर्धमान स्थानक संघ, गुजराती जैन संघ, दादा वाडी संस्थान, श्री पारसनाथ श्वेतांबर जैन मंदिर, श्री आदिनाथ दिगंबर जैन मोठे मंदिर, श्री सैतवाल मंदिर, श्री परमार मंदिर, श्री सेवराण मंदिर, श्री सुपार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर साईनगर, अर्हंम ग्रुप, श्री ओसवाल युवक संघ, वात्सल्य फाउंडेशन, महावीर मंदिर, श्री चंद्रनाथ स्वामी जैन संस्थान आदी सकल जैन समाजाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT